सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:22 IST2025-08-25T14:21:28+5:302025-08-25T14:22:22+5:30

किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

5000 water tankers, 1000 ambulances Manoj Jarange revealed the entire plan to march towards Mumbai | सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!

सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारंगे यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबई, असा नारा देत, मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, कुठलेही कारण न सांगता, शेतकरी, चालक, वाहक, वारकरी आदी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी मराठा बांधवांना, असतील त्यांनी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सोबत घ्या. किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले, "शेतकरी असेल, व्यवसायिक असेल, ट्रकवर असेल, बसवर ड्रायव्हर कंडक्टर असेल, महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, टाळकरी, गायक, वादक, या सर्वांनी यावेळी तुटून पडावे. सगळे जण मुंबईकडे निघा आता, कुणी शेतीचे कारण सांगू नका, कुणी नोकरीचे कारण सांगू नका, डॉक्टर-वकिलांनी सांगू नका सर्वांनी तयारीने चलायचे आहे." 

"विशेष करून आज पासून महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सांगतो की, जेथे-जेथे पाण्याचे टँकर असतील, ते सोबत घ्या आपल्या मुलांना पिण्याचे पाणी लागेल. जेजे डॉक्टर बंधव ही प्रेस ऐकत आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की, त्यांनीही अँब्यूलन्स आणि  औषधी सोबत घ्यावी. १००० हून अधिक अँब्यूलन्स हव्यात आणि ५००० हून अधिक पाण्याचे टँकर हवेत. मी सांगितले आहे, ५००० हून अधिक पाण्याचे टँकर घ्याचे आणि तेथे एकही नसले, तर तुम्ही म्हणाल, ५००० हजार टँकर सांगितले आणि येथे एकही नाही. माझ्याकडे काय कंपनी आहे का? जिल्ह्या जिल्यातील आपल्या बांधवांना हे घडवून आणावे लागणार आहे," असे जरांगे म्हणाले. 

जरांगे पुढे म्हणाले, "याच बरोबर मी आणखी चार आवाहणे केली आहेत. शिक्षक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील आणि श्रीमंत राजकारणी मराठे असतील, यांनी आपापली वाहने बाहेर काढावीत, असे मी म्हटले आहे. तुम्हाला नोकरीवर जायचे तर जा, पण आपली वाहने बाहेर काढा. तुम्ही आम्हाल केवळ तीन दिवस साथ द्या. २७,२८ आणि २९ तारखेला आम्ही मैतानावर बसलो की तुम्ही परत या हवं तर. तुम्ही थांबू नका." 

मला आंदोल शांततेत हवं... -
"मराठा समाजाला खरे बोलायला हवे, आम्हाल खोटं होलून कुणालाही मुंबईत न्यायचे नाही. सर्वांनी मुंबई कडे चलायचे आहे. आपापली वाहने घेऊन. आम्ही तेथे बसल्यानंतर तुम्ही आम्हाल आशीर्वाद द्या आणि परत या. ही सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करतो. आपण संपूर्ण शक्तीनीशी यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एकच सांगतो की मला आंदोल शांततेत हवे आहे. कुणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्यासोबत यायचे नाही," असेही जरांगे यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

Web Title: 5000 water tankers, 1000 ambulances Manoj Jarange revealed the entire plan to march towards Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.