दानापूर येथील जुई धरणातून काढला ४ लाख घनफूट गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:03 IST2018-07-25T01:02:43+5:302018-07-25T01:03:17+5:30
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

दानापूर येथील जुई धरणातून काढला ४ लाख घनफूट गाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरनातून ९ एप्रिल ते १० जून २०१८ पर्यंत ४ लक्ष घन फुट गाळ काढल्याने धरणात जास्तीचा पाणीसाठा साठण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
येथील धरणातून भोकरदन शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणीपुरवठा होतो. धरणात गाळाचे प्रमाण वाढल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी धरणातील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. महाजन ट्रस्टच्या वतीने ९ एप्रिल ते १० जून या कालावधीत दोन पोकलेच्या सहाय्याने तब्बल ४ लक्ष घनफूट गाळ काढण्यात आला. काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला.१४ एप्रिल आ. संतोष दानवे व जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदींसह सिंचन, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचाºयांनी पाहणी केली. धरणातील गाळ काढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्याची क्षमता तयार झाल्याचे पाटबंधारे, सिंचन विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात जोरदार पाऊस झाल्यास परिसरातील गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार नाही.