परतूर तालुक्यात २६० ‘होमगाडर््स’ वेटिग वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:20 IST2019-03-18T00:20:20+5:302019-03-18T00:20:37+5:30
२६० होमगार्ड वेटिंग वर असून यामध्ये ७२ महिलांचा समावेश आहे.

परतूर तालुक्यात २६० ‘होमगाडर््स’ वेटिग वर
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यात २६० होमगार्ड वेटिंग वर असून यामध्ये ७२ महिलांचा समावेश आहे. तर जिल्ह्यासाठी ही संख्या १३०० असल्याचे सांगण्यात आले.
दिवसेंदिवस सुशिक्षित बेकारांची संख्या वाढत आहे. सद्या तरूण वर्ग आहे, मिळेल ती नोकरी स्वीकारायला तयार आहे. ज्या गृह रक्षक दलात एके काळी कोणीच जायला तयार नव्हते, त्यात भरती होण्यासाठी सुशिक्षित तरुणांची स्पर्धा लागली आहे. पोलिसांच्या धर्तीवरच सदरील भरती होत असल्याचे चित्र आहे. यासाठी युवकांनी आपली निवड होण्यासाठी तयारीला लागले आहेत.