सव्वादोन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:42 IST2018-05-08T00:42:34+5:302018-05-08T00:42:34+5:30

घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा तोडून रोख रक्कम व दागिने, असा सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

2.25 lacs burglary | सव्वादोन लाखांची घरफोडी

सव्वादोन लाखांची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजा तोडून रोख रक्कम व दागिने, असा सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. शहरातील बिहारीलालनगरात रविवारी रात्री ही घटना घडली.
व्यावसायिक मधुसुदन रमेशलाल झंवर यांचे लालबाग परिसरातील बिहारीलालनगरात निवास्थान आहे. झंवर कुटुंबीय चार मे रोजी बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी घराच्या छतावरून गॅलरीमध्ये उतरुन गॅलरीचा दरवाजा तोडला.
आत प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या, तुळशीमाळ, सोन्याचे ब्रासलेट, असे एक लाख ९५ हजारांचे दागिने व रोख तीस हजार रुपये चोरून नेले.
सोमवारी बाहेरगावाहून परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे मधुसूदन झंवर यांच्या लक्षात आले. त्यांनी सदर बाजार पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार रमेश रुपेकर तपास करीत आहेत.

Web Title: 2.25 lacs burglary