शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२०० महिलांचा कुटुंब नियोजनात पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे ...

जालना : जिल्ह्यात मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी पुरूषांनी मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे कोनाडोळा केला आहे. गत महिन्यापासून जिल्ह्यात २०० महिलांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसºया क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येतो. जे महिला व पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतात. त्यांना शासनातर्फे मदतदेखील केली जाते. सर्वसामान्य महिलेला २५० रूपये तर अनुसूचित जाती जमाती, दारिद्रय रेषेखालील महिलांना ६५० रूपये दिले जातात. पुरूषांनी नियोजन शस्त्रक्रिया केली तर १०० रूपये दिले जातात.

मागील दहा ते अकरा महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवरही परिणाम झाला. मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. लॉकडाऊनला शिथीलता मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने मागील महिन्यापासून पुन्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. आतापर्यंत २०० महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हसनाबाद आरोग्य केंद्रात सवार्धिक शस्त्रक्रिया

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील आरोग्य केंद्रात सवार्धिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या केंद्रात ५१ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर रेणुकाई पिंपळगाव ३८, दहिफळ खंदारे २५, ढोकसाळ ३२, वाटुर १२, खासगाव १७, तर शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद होत्या. मागील महिन्यापासून शस्त्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात २०० महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. एकाही पुरूषाने शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला नाही. महिलांसह पुरूषांनीही शस्त्रक्रिया करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.