शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाही; रावसाहेब दानवेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:35 IST2023-02-17T16:35:23+5:302023-02-17T16:35:50+5:30

रावसाहेब दानवे यांनी यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. 

16 MLAs of Shinde group will not be disqualified; Faith of Central Minister Raosaheb Danve | शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाही; रावसाहेब दानवेंचा विश्वास

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाही; रावसाहेब दानवेंचा विश्वास

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी सभागृहाला सामोरं जायला हवं होतं. शिवाय भाजपाला कसा दगा दिला हे सांगण्याबरोबरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत का चाललो हे सांगायला हवं होतं, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला तर विजय भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच होईल असं दानवें यांनी म्हटलं आहे. आज जालन्यातील बदनापूरमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पहाटेच्या शपथविधी बद्दल मला काहीही माहीत नव्हतं असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या दोघांच्यामध्ये मी सध्या बोलणं योग्य नाही, असेही दानवे म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयावर दोन्हीही गटाने विश्वास ठेवावा, असंही ते म्हणाले. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार नाही, असा विश्वास दानवे यांनी वर्तवला आहे.

Web Title: 16 MLAs of Shinde group will not be disqualified; Faith of Central Minister Raosaheb Danve