शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:49 AM

पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे.

ठळक मुद्देनिसर्ग धमाल शाळा उपक्रम : पाणी फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे. जाफराबाद येथील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, यावर्षी राज्यातील ७६ तालुक्यात वॉटर कप स्पर्धा राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याचा समावेश आहे.तालुक्यातील पंधरा निवडक शाळांच्या सहभागाने पुढील काळात पाण्याची चळवळ गावा-गावात पोहचविली जाईल. या उपक्रममध्ये खेळ, गाणी, कृती, चर्चा या माध्यमातून मुलांमध्ये पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.जमीनीतील घटत चाललेली पाण्याची पातळी पुर्वरत व्हावी, यासाठी भावी पिढी सगज होऊन निसर्ग, जल, जंगल, जमीन याविषयी जागरुक होणे हा या मागचा उद्देश आहे. यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक परिश्रम घेत आहे.याकामी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संस्थाप्रमुख यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक बी. एस. सय्यद व ज्ञानेश्वर इधाटे यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्रWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा