जालन्यात १४०० लिटर रॉकेल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:22 IST2018-10-27T00:21:24+5:302018-10-27T00:22:29+5:30
काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

जालन्यात १४०० लिटर रॉकेल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एका वाहनाद्वारे अवैध्यरित्या रॉॅकेलचे भरलेले ड्रम घेऊन एक वाहन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन मूर्तीवेस मंगळवारबाजार येथून पोलिसांनी टाटा एस (क्र.एमएच.२१.एक्स.७००६) या वाहनाला थांबवून चालकास विचारपूस केली असता, त्याने सात ड्रममध्ये गोडतेल घेवून जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, रॉकेलचा वास येत असल्याने पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता, त्याने सात ड्रममध्ये रॉकेल असल्याची कबूली दिली. त्याच्याकडून सात रॉकेएलचे ड्रम ज्यात ४१ हजार २०९ किंमतीचे १३६५ लिटर रॉकेलसह एक वाहन असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महादेव राऊत, पोउपनि. रुपेकर, कर्मचारी लांडगे, बोंद्रे, धस, काळे, खार्डे, चेके, कदारे, घोडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. हे रॉकेल वानांमध्ये सर्रासपणे टाकले जाणार असल्याचे कळते.
वाहनांसाठी उपयोग
जालना शहर व परिसरातील अनेक दुचाकी आणि रीक्षांमध्ये इंधन म्हणून सर्रासपणे रॉकेलेचे मिश्रण केले जाते. त्यामूळे वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.