सौदी अरेबियात "योग"ला मिळाला खेळाचा दर्जा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:31 IST2017-11-14T15:31:05+5:302017-11-14T15:31:51+5:30

भारतात योग हा व्यायामाचा प्रकार आहे की हिंदू धर्माचरणाता एक भाग यावरून वाद विवाद सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना

"Yoga" in Saudi Arabia got the status of the game | सौदी अरेबियात "योग"ला मिळाला खेळाचा दर्जा 

सौदी अरेबियात "योग"ला मिळाला खेळाचा दर्जा 

रियाध - भारतात योग हा व्यायामाचा प्रकार आहे की हिंदू धर्माचरणाता एक भाग यावरून वाद विवाद सुरू आहेत. मात्र दुसरीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा दिला आहे. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. 
सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे. 
उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते. 
अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ यांचे मत आहे की, योग आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.  

Web Title: "Yoga" in Saudi Arabia got the status of the game