शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:54 IST

Houthi involvement in Iran-Israel war: मध्यपूर्व युद्धाचा विस्तार: येमेनमधून इस्रायलवर पहिला थेट क्षेपणास्त्र हल्ला. बीयर शेबा शहरात सायरनचा आवाज. हूती बंडखोरांचा युद्धातील प्रवेश?

२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत असताना, इराणचा मित्र असलेल्या येमेनमधील हूती बंडखोरांनी या संघर्षात अधिकृतपणे उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी येमेनमधून इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले, ज्याची पुष्टी इस्रायली संरक्षण दलाने केली आहे.

येमेनमधून डागलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या दक्षिणेकडील बीयर शेबा आणि नेगेव वाळवंटी भागाच्या दिशेने येत होते. यामुळे संपूर्ण परिसरात धोक्याचे सायरन वाजले आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच यशस्वीपणे रोखले आणि नष्ट केले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

हूतींचा 'फिंगर ऑन ट्रिगर' इशाराया हल्ल्याच्या काही तास आधीच हूती बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले होते की, "जर अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले थांबले नाहीत, तर आमचे बोट ट्रिगरवर आहे." हा हल्ला त्याच इशाऱ्याचा भाग मानला जात आहे. येमेनच्या या हस्तक्षेपामुळे आता केवळ जमिनीवरच नाही, तर लाल समुद्रातील जागतिक व्यापारावरही संकट ओढवले आहे. हूतींनी यापूर्वीही लाल समुद्रात जहाजांवर हल्ले केले होते, आता त्यांनी आपला मोर्चा थेट इस्रायलकडे वळवला आहे.

नवा युद्ध मोर्चाआतापर्यंत इस्रायल केवळ उत्तर सीमेवर हिजबुल्लाह (लेबनॉन) आणि पूर्व सीमेवर इराणशी लढत होता. मात्र, दक्षिणेकडून येमेनने हल्ला केल्यामुळे इस्रायलला आता तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर लष्करी शक्ती विभागून लढावे लागणार आहे.

प्रादेशिक युद्धाचा धोकातज्ज्ञांच्या मते, येमेनचा या युद्धात समावेश होणे हे एका मोठ्या 'प्रादेशिक युद्धाचे' संकेत आहेत. यामुळे लाल समुद्र आणि त्यातून होणारी जागतिक व्यापार वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. इस्रायलच्या 'ॲरो' किंवा 'डेव्हिड्स स्लिंग' या संरक्षण यंत्रणांनी हे क्षेपणास्त्र नष्ट केले की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू इस्रायल आता येमेनवरही हल्ले चढवण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yemen's Houthi Rebels Launch Ballistic Missile at Israel; Sirens in Beer Sheba

Web Summary : Yemen's Houthi rebels fired a ballistic missile at Israel, triggering sirens in Beer Sheba. Israel's defense systems intercepted the missile. The Houthis warned of further action if attacks on Iran continue, escalating regional tensions and threatening Red Sea trade.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध