युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:54 IST2026-03-28T10:53:24+5:302026-03-28T10:54:48+5:30

Houthi involvement in Iran-Israel war: मध्यपूर्व युद्धाचा विस्तार: येमेनमधून इस्रायलवर पहिला थेट क्षेपणास्त्र हल्ला. बीयर शेबा शहरात सायरनचा आवाज. हूती बंडखोरांचा युद्धातील प्रवेश?

Yemen Israel missile attack: War breaks out! First ballistic missile attack on Israel from Yemen; Siren wails in 'Beer Sheba', direct warning from Houthi rebels | युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

युद्ध भडकले! येमेनमधून इस्रायलवर पहिला बॅलिस्टिक मिसाईल्स हल्ला; 'बीयर शेबा'मध्ये सायरनचा थरार, हूती बंडखोरांचा थेट इशारा

२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत असताना, इराणचा मित्र असलेल्या येमेनमधील हूती बंडखोरांनी या संघर्षात अधिकृतपणे उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी येमेनमधून इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आले, ज्याची पुष्टी इस्रायली संरक्षण दलाने केली आहे.

येमेनमधून डागलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या दक्षिणेकडील बीयर शेबा आणि नेगेव वाळवंटी भागाच्या दिशेने येत होते. यामुळे संपूर्ण परिसरात धोक्याचे सायरन वाजले आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच यशस्वीपणे रोखले आणि नष्ट केले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

हूतींचा 'फिंगर ऑन ट्रिगर' इशारा
या हल्ल्याच्या काही तास आधीच हूती बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले होते की, "जर अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले थांबले नाहीत, तर आमचे बोट ट्रिगरवर आहे." हा हल्ला त्याच इशाऱ्याचा भाग मानला जात आहे. येमेनच्या या हस्तक्षेपामुळे आता केवळ जमिनीवरच नाही, तर लाल समुद्रातील जागतिक व्यापारावरही संकट ओढवले आहे. हूतींनी यापूर्वीही लाल समुद्रात जहाजांवर हल्ले केले होते, आता त्यांनी आपला मोर्चा थेट इस्रायलकडे वळवला आहे.

नवा युद्ध मोर्चा
आतापर्यंत इस्रायल केवळ उत्तर सीमेवर हिजबुल्लाह (लेबनॉन) आणि पूर्व सीमेवर इराणशी लढत होता. मात्र, दक्षिणेकडून येमेनने हल्ला केल्यामुळे इस्रायलला आता तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर लष्करी शक्ती विभागून लढावे लागणार आहे.

प्रादेशिक युद्धाचा धोका
तज्ज्ञांच्या मते, येमेनचा या युद्धात समावेश होणे हे एका मोठ्या 'प्रादेशिक युद्धाचे' संकेत आहेत. यामुळे लाल समुद्र आणि त्यातून होणारी जागतिक व्यापार वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. इस्रायलच्या 'ॲरो' किंवा 'डेव्हिड्स स्लिंग' या संरक्षण यंत्रणांनी हे क्षेपणास्त्र नष्ट केले की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही. परंतू इस्रायल आता येमेनवरही हल्ले चढवण्याची शक्यता आहे. 

Web Title : यमन के हूती विद्रोहियों ने इस्राइल पर बैलिस्टिक मिसाइल दागी; बीयर शेबा में सायरन

Web Summary : यमन के हूती विद्रोहियों ने इस्राइल पर बैलिस्टिक मिसाइल दागी, जिससे बीयर शेबा में सायरन बजने लगे। इस्राइल की रक्षा प्रणालियों ने मिसाइल को रोक दिया। हूतियों ने ईरान पर हमलों के जारी रहने पर और कार्रवाई की चेतावनी दी, जिससे क्षेत्रीय तनाव बढ़ गया और लाल सागर व्यापार खतरे में पड़ गया।

Web Title : Yemen's Houthi Rebels Launch Ballistic Missile at Israel; Sirens in Beer Sheba

Web Summary : Yemen's Houthi rebels fired a ballistic missile at Israel, triggering sirens in Beer Sheba. Israel's defense systems intercepted the missile. The Houthis warned of further action if attacks on Iran continue, escalating regional tensions and threatening Red Sea trade.