x Down : एलन मस्क मालक असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स सोमवारी जगभरात ठप्प झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच दिवसांत तीन वेळा ठप्प झाल्याने या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एक्स डाऊन असल्याची कल्पना अनेकांना नसल्याने लॉगिन करताना येणाऱ्या तक्रारी केल्या गेल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डाऊन डिटेक्टर वेबसाईटनुसार, एक्स प्लॅटफॉर्म सोमवारी (१० मार्च) सायंकाळी ठप्प झाला. त्यानंतर रात्री ७ वाजता पुन्हा एकदा एक्स डाऊन झाले. त्यानंतर तासभरात म्हणजे ८.४४ वाजता ठप्प झाले. एकाच वेळी जगभरात एक्स ठप्प झाले. त्यामुळे एक्स यूजर्स तक्रारी कंपनीकडे करू लागले.
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भारत या देशांसह जगभरातील अनेक देशातील लोकांना एक्सचा वापर करताना समस्या आल्या. तीन वेळा एक्स ठप्प झाल्याने यूजर्संनी तक्रारी केल्या. ४० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी एक्स वापरत असताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे केल्या.
डाऊन डिटेक्टर वेबसाईटनुसार ५६ टक्के वापरकर्त्यांना अॅप वापरताना समस्या आल्या. तर ३३ टक्के वेबसाईटचा वापर करताना अडथळे आले. ११ टक्के वापरकर्त्यांना याबद्दलच्या तक्रारी केल्या.
याबद्दल एलन मस्क म्हणाले की, 'एक्सवर खूप मोठा सायबर हल्ला झाला होता (अजूनही होत आहे). आमच्यावर दररोज हल्ले होत आहेत, पण हे हल्ले एकसंघपणे केले जाताहेत. या हल्ल्यात एक मोठा समूह किंवा देश सहभागी आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत.'