शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

वुुहान हे जैविक चेर्नोबिल; स्टीव्ह बॅनॉन यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:21 AM

चीनमधील काही विषाणूतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले असून कोरोनाचा संसर्ग पसरण्यात चीनच्या भूमिकेबद्दल पुरावे गोळा करण्यास ते अमेरिकेला मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वॉशिंग्टन : चीनमधील वुहान हे जैविक चेनोर्बिल आहे असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी स्टीव्ह बॅनॉन यांनी केला आहे. चीनमधील काही विषाणूतज्ज्ञ पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले असून कोरोनाचा संसर्ग पसरण्यात चीनच्या भूमिकेबद्दल पुरावे गोळा करण्यास ते अमेरिकेला मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.हाँगकाँग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ या संस्थेत काम करणारी चिनी विषाणूतज्ज्ञ डॉ. ली मेंग यान या सध्या परागंदा झाल्या असून त्य अज्ञात स्थळी आहेत. कोरोना विषाणूविषयी चीन सरकारला पूर्वीपासून कल्पना होती व या विषाणूमुळे साथ पसरल्यानंतर चीन वस्तुस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेनॉन यांनी चीनवर टीका केली आहे.बॅनॉन हे ट्रम्प यांचे धोरणविषयक माजी मुख्य सल्लागार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी होण्यासाठी बॅनॉन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी सांगितले की, कोरोनाची साथ पसरविण्यास चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या कृष्णकृत्यांचे पुरावेही काही चिनी विषाणूतज्ज्ञांनी अमेरिकेला दिले आहेत. वुहान इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी या संस्थेसह त्या शहरातील इतर प्रयोगशाळांत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी अनेकांनी चीन व हाँगकाँगमधून फेब्रुवारीच्या मध्यापासून काढता पाय घेतला आहे. कोरोना साथ पसरविण्यासाठी चीनने बजाविलेल्या भूमिकेचे भरभक्कम पुरावे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा गोळा करत आहे. प्रक्रियेला आणखी वेळ लागणार आहे.बॅनॉन यांनी सांगितले की, चीन वुहानमधील प्रयोगशाळांमध्ये विषाणूंसंदभार्तील अनेक प्रयोग सुरू असतात. त्यातूनच अपघाताने किंवा प्रयोगशाळेतील मदतनीसाच्या चुकीने कोरोना विषाणू वातावरणात मिसळला.युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्टीत २६ एप्रिल १९८६ रोजी भीषण स्फोट होऊन त्यात १००हून अधिक लोक मरण पावले होते. या दुर्घटनेत शेकडो लोकांना किरणोत्साराची बाधा झाली होती. चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला व साºया जगभर पसरला. त्या पार्श्वभूमीवर स्टीव्ह बॅनॉन यांनी चीनमधील वुहान शहराला जैविक चेनोर्बिल म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका