China Rocket out of control: चीनमुळे जग पुन्हा मोठ्या संकटात; अंतराळात पाठवलेले रॉकेट नियंत्रणाबाहेर, कुठेही कोसळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:58 AM2021-05-06T08:58:16+5:302021-05-06T09:00:29+5:30

Out of control Chinese rocket is falling back to Earth: अमेरिकेच्या सरकारने गंभीर इशारा देताना म्हटले की, 21 टन वजनाचे हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी कधीही प्रवेश करू शकते. हे रॉकेट सध्या चार मैल प्रति सेकंद एवढा प्रचंड वेगाने पुढे जात आहे. 

world is in big trouble again because of China; Rocket sent into space out of control, will crash anywhere | China Rocket out of control: चीनमुळे जग पुन्हा मोठ्या संकटात; अंतराळात पाठवलेले रॉकेट नियंत्रणाबाहेर, कुठेही कोसळण्याची शक्यता

China Rocket out of control: चीनमुळे जग पुन्हा मोठ्या संकटात; अंतराळात पाठवलेले रॉकेट नियंत्रणाबाहेर, कुठेही कोसळण्याची शक्यता

Next

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजविलेला असताना पुन्हा एकदा चीन (China) जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. चीनने अंतराळात पाठविलेले रॉकेट (Rocket) अनियंत्रित झाले असून पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करताना मोठा विध्वंस करण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. यामुळे जगभरातील देश चिंतेत पडले असून हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी प्रवेश करणार आहे. महत्वाचे म्हणजे चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती. (The US Department of Defence has said it is tracking the Chinese rocket that is out of control and set to re-enter Earth's atmosphere.)

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की


अमेरिकेच्या सरकारने गंभीर इशारा देताना म्हटले की, 21 टन वजनाचे हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत 8 मे रोजी कधीही प्रवेश करू शकते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने वायुमंडळात पुन: प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे. सध्या हे सांगणे कठीण आहे की, हे रॉकेट पृथ्वीच्या कोणत्या भागातून प्रवेश करेल आणि जगाच्या कोणत्या भागावर कोसळेल. स्पेस ट्रॅकवर या रॉकेटचे लोकेशन आणि गतीबाबत नियमित माहिती दिली जात आहे. या रॉकेटबाबत जशीजशी माहिती समोर येत आहे, अमेरिकी सरकार ती देखील जगभरासाठी उपलब्ध करत आहे. अमेरिकेने आपले सर्व सॅटेलाईट या रॉकेटला ट्रॅक करण्यासाठी कामाला लावले आहेत. अन्य सॅटेलाईट ट्रॅकरनीदेखील या 100 फूट लांब आणि 16 फूट रुंद रॉकेटबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. हे रॉकेट सध्या चार मैल प्रति सेकंद एवढा प्रचंड वेगाने पुढे जात आहे. 

...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं 

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माईक हावर्ड यांनी सांगितले की, स्पेस कमांडच्या अंतर्गत ही घटना येत आहे. चिनी रॉकेटच्या स्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या काही तास आधीच हे रॉकेट कोणत्या भागातून प्रवेश करेल हे सांगता येणार आहे. 


चीनने गेल्याच आठवड्यात  स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य लाँगमार्च 5बी हे रॉकेट अंतराळात (China Rocket out of control) पाठविले होते. हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे कॅरिअर रॉकेट आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयव्हरी कोस्टच्या इमारतींना नुकसान झाले होते. काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या. आजचे हे रॉकेट ज्या गतीने पुढे जात आहे ते पाहता ते न्यूयॉर्क आणि माद्रीद किंवा दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजुने प्रवेश करू शकते. या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी, कुठे वळेल हे देखील सांगता येत नाहीय, असे तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल यांनी सांगितले. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: world is in big trouble again because of China; Rocket sent into space out of control, will crash anywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app