...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:41 PM2021-05-03T13:41:44+5:302021-05-03T15:22:22+5:30

NASA asteroid warning: पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे.

NASA warns if a large asteroid hits Earth, explosion like atomic bomb | ...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

googlenewsNext

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) आणि युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेने मोठा इशारा दिला आहे. भविष्यात येणाऱ्या वर्षांमध्ये मोठा उल्कापिंड (asteroid ) पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असून पृथ्वी या आघातासाठी तयार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. (In a NASA simulation of an asteroid impact, couldn't stop a space rock from decimating Europe)


पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे. यानंतर या दोन्ही संस्थांनी हा निश्कर्ष काढला आहे. 26 एप्रिलला नासाच्या प्लॅनेटरी डिफेंस कोऑर्डिनेशन ऑफिसने एक पूर्वाभ्यास केला आहे. यामध्ये त्यांनी जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर त्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज वर्तविला आहे. वैज्ञानिकांनुसार सध्यातरी याची शक्यता दूरदूरवर नाहीय. मात्र, भविष्यात अशाप्रकरचा आघात होऊ शकतो. या अभ्यासानंतर नासाने आणि युरोपिय एजन्सीने पृथ्वीला वाचविण्याच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. 


कपोलकल्पित...
सध्यातरी हा अभ्यास कपोलकल्पित उल्केवर आधारित आहे. नासाच्या सेंटरने एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळणार असल्याची कल्पना केली होती. या उल्केला 2021 PDC नाव देण्यात आले होते. ही उल्का 35 मीटर लांब आणि 700 मीटर रुंद होती. या अभ्यासात असे आढळले की, ही उल्का पृथ्वीवर आदळण्याची 5 टक्केच शक्यता आहे. ही उल्का युरोमध्ये आदळू शकते. जर ही उल्का आदळली तर अणुबॉम्बएवढी तिची तीव्रता असणार आहे. एक अणुबॉम्ब जेवढा विध्वंस करू शकतो तेवढा विध्वंस ही उल्का करणार आहे.


पृथ्वीचे संरक्षण कसे करणार?
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीवर भविष्यात येणाऱ्या संकटाला अंतराळातच उडविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी उल्का पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी तसेच नष्ट करण्यासाठी आण्विक हत्यारे वापरण्याचा पर्याय शोधू लागले आहेत. अण्विक हल्ला करण्याचा सल्ला या वैज्ञानिकांनी दिला आहे.

Web Title: NASA warns if a large asteroid hits Earth, explosion like atomic bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.