लाइव्ह रिपोर्टिंगवेळी महिलेला नको तिथे स्पर्श, झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 06:53 IST2023-09-15T06:53:19+5:302023-09-15T06:53:44+5:30

Crime News: एका वृत्तवाहिनीसाठी ‘लाइव्ह रिपोर्टिंग’  करणाऱ्या महिला पत्रकाराला नको तिथे स्पर्श केल्याप्रकरणी एका इसमाला अटक झाली.

Woman touched where she didn't want during live reporting, arrested | लाइव्ह रिपोर्टिंगवेळी महिलेला नको तिथे स्पर्श, झाली अटक

लाइव्ह रिपोर्टिंगवेळी महिलेला नको तिथे स्पर्श, झाली अटक

स्पेनच्या माद्रिद येथून एका वृत्तवाहिनीसाठी ‘लाइव्ह रिपोर्टिंग’  करणाऱ्या महिला पत्रकाराला नको तिथे स्पर्श केल्याप्रकरणी एका इसमाला अटक झाली. मंगळवारी इसा बॅलादो ही पत्रकार दरोड्याच्या घटनेचे वार्तांकन करत होती. यावेळी  अचानक तिच्या मागून एक इसम येतो आणि तिला नको तिथे स्पर्श करत कोणत्या कार्यक्रमासाठी काम करतेय? असे विचारतो. या घटनेने हैराण झालेली इसा वार्तांकन सुरूच ठेवते, पण चॅनलचा अँकर तिला थांबवतो आणि त्या माणसाने तुला स्पर्श केला का, असे विचारतो. इसा हो बोलताच अँकर त्या मूर्ख माणसाला कॅमेऱ्यासमोर आणण्यास सांगतो. मग इसा त्या व्यक्तीला, मी कोणत्या चॅनलसाठी काम करतेय हे विचारण्यासाठी तुला ‘तिथे’ स्पर्श करायची काय गरज होती? मी लाइव्ह शो करतेय आणि माझे काम करत आहे असे सुनावते. त्यावर स्पर्श केल्याचे नाकारत तो जातानाही तिच्या केसांवरून हात फिरवतो.
व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम करत असताना एका रिपोर्टरवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली, अशी पोस्ट केली.

Web Title: Woman touched where she didn't want during live reporting, arrested