रागात गर्लफ्रेन्डने फेकून मारला मोबाइल, बॉयफ्रेन्डचा उपचारादरम्यान गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:17 IST2021-09-24T13:15:54+5:302021-09-24T13:17:47+5:30

झालं असं की, २२ वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेजने रागाच्या भरात आपल्या २३ वर्षीय बॉयफ्रेन्ड लुइस ग्वांटेला फोन फेकून मारला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Woman throws mobile phone on boyfriends head during fight death | रागात गर्लफ्रेन्डने फेकून मारला मोबाइल, बॉयफ्रेन्डचा उपचारादरम्यान गेला जीव

रागात गर्लफ्रेन्डने फेकून मारला मोबाइल, बॉयफ्रेन्डचा उपचारादरम्यान गेला जीव

अनेकदा माणूस रागाच्या भरात असं काही करतो ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होत राहतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रागात एखाद्याने दुसऱ्याला मारलं. रागात काहीतरी फोडलं. पण रागामुळे घडलेली एक अशी घटना समोर आली आहे ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. एका तरूणीने रागाच्या भरात असं केलं की, ज्यामुळे तिला तुरूंगाची हवा खावी लागू शकते.

झालं असं की, २२ वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेजने रागाच्या भरात आपल्या २३ वर्षीय बॉयफ्रेन्ड लुइस ग्वांटेला फोन फेकून मारला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

सेल्फ डिफेन्ससाठी केलं असं

The Sun च्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या ला नेसियनची राहणारी रोक्साना विरोधात चौकशी सुरू आहे. यावर्षी एप्रिलमद्ये तिचा बॉयफ्रेन्ड लुईस तिला मारहाण करत होता. तेव्हाच सेल्फ डिफेन्समद्ये तिने बॉयफ्रेन्डवर फोन पेकला. हा फोन त्याच्या डोक्यावर लागला.

उपचारा दरम्यान मृत्यू

फोन लागल्यावर लुईसने डोकेदुखी आणि अस्वस्थता होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी लुईसंच चेकअप केलं तर समोर आलं की, त्याला डोक्याला गंभीर जखम झाली आहे. डॉक्टरांनी त्याचं लगेच ऑपरेशन केलं. पण त्याचा मृत्यू झाला. यानंतर लुईसची आई पोलिसांकडे गेली आणि तिने न्यायाची मागणी केली.  वकिल कोर्टात म्हणाले की, मोबाइल फोन लागल्याने लुईसच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
 

Web Title: Woman throws mobile phone on boyfriends head during fight death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.