शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Iphone 6 ऐवजी महिलेला बॉक्समध्ये मिळाले बटाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:50 IST

ऑनलाईन व्यवहार करताना चुकीची वस्तु येणं हे ठीके पण दुकानातून घेतानाही असं झालं तर ?

ठळक मुद्देआयफोन ८ विकत घेऊनसुध्दा तिला बॉक्समध्ये बटाट्याच्या कापा आल्या.या आयफोनसाठी तिने ८० डॉलर्स खर्च केले होते.

विस्कॉन्सीन - ऑनलाईन साईट्सवरून मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवल्यावर साबणाच्या वड्या, चिप्स असे पदार्थ डिलिव्हर झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवल्यावर आधी आपण बॉक्समध्ये काय आहे हे तपासून घेतो, आणि मगच पुढचा व्यवहार करतो. पण जर एका स्टॉलवरून आयफोन ६ खरेदी केल्यावर घरी आल्यानंतर  ते बटाटे आहेत असं समोर आलं तर आश्चर्य वाटेल ना. पण युएसमध्ये असा प्रकार घडला आहे.

आणखी वाचा - आयफोनच्या किंमतीएवढ्याच खर्चात परदेश दौरा शक्य आहे!

आणखी वाचा - बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी

इव्हिनिंग स्टॅंडर्डच्या वृत्तानुसार, युएसमधल्या विस्कॉन्सीन या शहरात एक माणूस ब्लॅक फ्रायडेची ऑफर देत होता. विस्कॉन्सीनमध्ये एका ट्रकमधून विविध वस्तू विकण्यात येत होत्या. त्याच्याकडे कपडे, चप्पल, घड्याळं, पर्सेस, डीव्हिडी, सीडी, मोबाईल आणि लॅपटॉप अशा वस्तू होत्या. प्रत्येक वस्तूवर ऑफर असल्याने या महिलेने सगळ्या वस्तूंची पाहणी केली. त्यामध्ये आयफोन ६ ला २० टक्क्यांची सुट होती.  १०० डॉलरचा आयफोन ६ तिला ८० डॉलरमध्ये मिळत होता. त्यामुळे हा आयफोन घेण्याचा निर्णय घेतला. हा मोबाईल व्यवस्थित आहे की नाही, ड्युप्लिकेट तर नाही ना, यात काही दोष तर नाही ना या सगळ्या गोष्टींची तिने खात्री करून घेतली. मोबाईल अगदीच व्यवस्थित होता. नवा कोरा होता. त्यामुळे ऑफरमध्ये जर मोबाईल मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे, असा विचार करून तिने त्या मोबाईलचे ८० डॉलर भरले आणि मोबाईल पॅक्ड करायला सांगितलं.

आणखी वाचा - आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट

घरी आल्यावर आरामात तिने मोबाईलचा बॉक्स उघडला. बॉक्स उघडताच तिला धक्का बसला. त्या बॉक्समध्ये आयफोन नव्हताच. त्यात होते बटाटे. ८० डॉलरचे बटाट्यांचे ११ काप त्यात होते. ए‌वढंच नाहीतर त्या बॉक्समध्ये एक अॅण्ड्रॉइड मोबाईलचा चार्जरही देण्यात आला होता. हे म्हणजे जखमेवर मिठ चोळल्यासारखंच झालं. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवल्यावर ज्याप्रमाणे बॉक्स उघडल्याशिवाय पैसे देत नाही, त्याचप्रमाणे रस्त्यावरही वस्तू खरेदी करताना आपल्या पिशवीत किंवा बॉक्समध्ये नक्की काय भरलं जातंय याचीही शहानिशा करावी लागणार आहे. नाहीतर तुम्हीही उद्या आयफोन घ्यायला जाल आणि हाती कांदे-बटाटे येतील. 

तंत्रज्ञानासंबंधित आणखी बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

सौजन्य - www.standard.co.uk

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लस