आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट

By admin | Published: October 26, 2016 05:01 PM2016-10-26T17:01:52+5:302016-10-26T17:01:52+5:30

अॅपलचं जगप्रसिद्ध उत्पादन असलेल्या आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट झाली आहे.

IPhone sales fall for third consecutive year | आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट

आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26 - अॅपलचं जगप्रसिद्ध उत्पादन असलेल्या आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट झाली आहे. आयफोनच्या विक्रिमध्ये 19 टक्के कपात झाल्यामुळे कंपनीला 9 बिलियन डॉलरचे नुकसान झालं आहे. आयफोनला सर्वात जास्त नुकसान चीनच्या बाजारपेठेत झालं आहे. चीनमध्ये आयफोनची विक्री 30 टक्केनी घटली आहे. 
 
यापुर्वीही मार्च 2015 मध्ये आयफोनच्या विक्रीमध्ये 16.33 टक्के घट झाली होती. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत  45.51 बिलियन आयफोनच्या विक्रीची नोंद झाली. तर सरासरी वर्षभरात 48. 05 बिलियन आयपोनचे स्मार्ट फोन विकले गेले आहेत. मागच्या वर्षी याच तिमाहीत 6.12 कोटी आयफोन्सची विक्री झाली होती. 
 
आयफोनने सातत्याने अॅपलला मोठा नफा मिळवून दिला आहे. नफा आणि बाजार मूल्य लक्षात घेता अॅपल ही या क्षेत्रातली जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले असून अॅपलच्या शेअरचा भाव घसरला आहे. मागिल महिन्यात हँण्ससेटची विक्री कमी झाल्याने नफ्यातही घसरण झाली आहे. 
 

 

Web Title: IPhone sales fall for third consecutive year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.