यूएईमध्ये सत्तांतराचे संकेत; राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, मुलाच्या नावे केली 260 अब्ज डॉलर्सची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:23 IST2026-02-02T19:22:26+5:302026-02-02T19:23:16+5:30

यूएईच्या शाही कुटुंबात सध्या वाद सुरू आहे.

Winds of power transition in UAE; President's big decision, 260 billion dollars of wealth in the name of his son | यूएईमध्ये सत्तांतराचे संकेत; राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, मुलाच्या नावे केली 260 अब्ज डॉलर्सची संपत्ती

यूएईमध्ये सत्तांतराचे संकेत; राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, मुलाच्या नावे केली 260 अब्ज डॉलर्सची संपत्ती

UAE: संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्र आणि युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद यांना तब्बल 260 अब्ज अमेरिकी डॉलर्सची संपत्ती हस्तांतरित केली आहे. यूएईच्या शाही कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 335 अब्ज डॉलर्स इतकी असून, त्यातील बहुतांश हिस्सा आता खालिद यांच्या ताब्यात जाणार आहे. या निर्णयानंतर UAE मध्ये लवकरच सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्तांतराचा स्पष्ट संकेत?

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, राष्ट्राध्यक्ष जायद यांनी संपत्ती हस्तांतरण करून हे स्पष्ट संकेत दिले आहेत की, भविष्यात UAE चे सर्वोच्च नेतृत्व शेख खालिद यांच्याकडे सोपवले जाऊ शकते. सध्या UAE एकीकडे सौदी अरेबियासोबत तणावात आहे, तर दुसरीकडे नाहयान कुटुंबात अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला आहे.

शेख खालिद बिन मोहम्मद कोण आहेत?

खालिद हे युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. खालिद सध्या युएई सरकारचे क्राउन प्रिन्स आहेत. 1982 मध्ये जन्मलेले खालिद 2016 मध्ये पहिल्यांदा राजकारणात उतरले आणि सुरक्षा प्रमुख म्हणून काम सुरू केले. 2023 मध्ये खालिद यांना पदोन्नती देण्यात आली आणि त्यांना युएईचे क्राउन प्रिन्स घोषित करण्यात आले. 

खालिद यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण अबू धाबीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर ते पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसमध्ये गेले. खालिद यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला आहे.

कुटुंबाकडे किती संपत्ती आहे?

ब्लूमबर्गने 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर केली होती. या यादीत हे कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर होते. अहवालानुसार, या राजघराण्याकडे एकूण 335 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या या सत्ताधारी कुटुंबाच्या सर्व संपत्तीचा स्रोत तेल व्यवसाय आहे. या कुटुंबाचे प्रमुख शेख मोहम्मद बिन झायेद हे संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष देखील आहेत. 

नाहयान कुटुंबात सत्तासंघर्ष तीव्र

राष्ट्राध्यक्ष जायद यांचे धाकटे भाऊ शेख तहनून बिन जायद हे सध्या UAE चे सुरक्षा प्रमुख आहेत. सुमारे 45 वर्षांचे तहनून यांना ‘UAE चे गुप्तचर शेख’ असेही म्हटले जाते. तहनून बिन जायद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवत आहेत. ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टोकरन्सी फर्ममध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचेही ते निकटवर्तीय आहेत.

राष्ट्राध्यक्ष जायद यांना भीती आहे की, भविष्यात सौदीच्या मदतीने तहनून सत्तेसाठी आव्हान उभे करू शकतात. त्यामुळेच शेख खालिद यांना लवकरात लवकर सत्तेचा आणि संपत्तीचा वारसा देण्याचा हा निर्णय घेतल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.

Web Title : यूएई में सत्ता परिवर्तन: राष्ट्रपति ने बेटे को सौंपी 260 अरब डॉलर की संपत्ति

Web Summary : यूएई के राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान ने अपने बेटे शेख खालिद को 260 अरब डॉलर हस्तांतरित किए, जो क्षेत्रीय तनाव और आंतरिक पारिवारिक संघर्षों के बीच संभावित सत्ता परिवर्तन का संकेत है। इस कदम का उद्देश्य शेख खालिद के भविष्य के नेतृत्व को सुरक्षित करना है।

Web Title : UAE Power Shift: President Transfers $260 Billion Fortune to Son

Web Summary : UAE's President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan transferred $260 billion to his son, Sheikh Khalid, signaling a potential power transition amidst regional tensions and internal family struggles. This move aims to secure Sheikh Khalid's future leadership, fueled by concerns over challenges from his uncle.