अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प भडकले, दिली मोठी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:57 IST2026-04-02T09:56:54+5:302026-04-02T09:57:54+5:30

या युद्धात युरोपीय देशांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने ट्रम्प प्रचंड संतापले आहेत...

Will this small country become a scapegoat in the US-Israel and Iran war Trump gave a big threat | अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प भडकले, दिली मोठी धमकी

अमेरिका-इराण युद्धात 'बळीचा बकरा' बनणार युक्रेन? ट्रम्प भडकले, दिली मोठी धमकी


अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाटो देशांनी अमेरिकेला मोठा झाटका दिला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापलेले आहेत. हा वाद आता टोकाला पोहोचताना दिसत आहे. या युद्धात युरोपीय देशांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. मात्र यात 'बळीचा बकरा' बनू शकतो तो, गेल्या चार वर्षांपासून रशिसोबत युद्ध लढत असलेला युक्रेन. कारण आता ट्र्म्प यांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याची धमकी दिली आहे. 

"ही आमची लढाई नाही" : पाश्चात्य देश -
'फायनान्शियल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यपूर्वेला जोडला जाणारा स्ट्रॅट ऑफ होर्मुझ हा महत्वाचा जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी अमेरिकेला मदत करावी, असे आवाहन ट्रम्प यांनी पाश्चात्य देशांना केले होते. मात्र, फ्रान्स, स्पेन आणि इटली यांसारख्या देशांनी अमेरिकेला आपली लष्करी तळे वापरण्यास नकार दिला. तसेच, "ही आमची लढाई नाही," म्हणत, होर्मुझ सामुद्रधुनी खुला करण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या जागतिक आघाडीत सहभागी होण्यासही या देशांनी नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प संतापले आहेत.

"नाटो देश म्हणजे, कागदी वाघ..." -
तत्पूर्वी, "नाटो म्हणजे केवळ 'कागदी वाघ' (Paper Tiger) आहे. व्लादिमीर पुतीन यांनाही हे माहीत आहे. अमेरिका या संघटनेतून बाहेर पडण्याचा विचार करत आहे." असे ट्रम्प एका मुलाखतीत म्हटले होते. 

खरेतर, अमेरिकन कायद्यानुसार नाटोमधून बाहेर पडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असले, तरी ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे युरोपीय मित्रराष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इराणने होर्मुझ मार्ग रोखल्याने जागतिक पातळीवरील तेलाचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत.  

Web Title : ट्रम्प की धमकी के बाद अमेरिका-ईरान तनाव में यूक्रेन मोहरा बन सकता है।

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच ट्रम्प ने यूक्रेन को सहायता रोकने की धमकी दी। नाटो सहयोगियों ने सैन्य सहायता से इनकार किया, जिससे ट्रम्प निराश हुए। रूस से जूझ रहा यूक्रेन मोहरा बन सकता है, क्योंकि वैश्विक तेल की कीमतें बढ़ रही हैं।

Web Title : Ukraine: Potential pawn in US-Iran tensions after Trump's aid threat.

Web Summary : Trump threatens to cut aid to Ukraine amid US-Iran tensions. NATO allies decline military assistance, frustrating Trump. Ukraine, battling Russia, risks becoming a pawn as global oil prices soar.