शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचा 'THE END' होणार? ट्रम्प यांचा मोठा यूटर्न! आधी इराण उद्ध्वस्त करण्याची शपथ, आता 'होर्मुज'बाबत मोठी माघार; काय आहे नवा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:00 IST

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्याकडे लष्करी पर्याय उपलब्ध आहेत, मात्र ते सध्या त्यांच्या प्राधान्यक्रमात नाहीत... यापूर्वी, त्यांनी इराणला इशारा दिला होता की, जर त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील...

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प इराणसोबतचेयुद्ध फार अधिक खेचण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. 'होर्मुज सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याशिवायही युद्ध संपवण्याची तयारी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे बोलून दाखवल्याचे समजते. जर हा जलमार्ग जबरदस्तीने खुला करण्यासाठी थेट लष्करी कारवाई केली, तर युद्ध नियोजित वेळेपेक्षा ४ ते ६ आठवडे अधिक लांबू शकते, असे ट्रम्प प्रशासनाला वाटते. होर्मुज स्ट्रेट खुला करण्यासाठी US नंतरही स्वतंत्रपणे ऑपरेशन आखू शकतो.

'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, "अमेरिकेचे मुख्य लक्ष आता इराणचे नौदल आणि क्षेपणास्त्र साठा कमकुवत करून युद्ध थांबवण्यावर असेल. महत्त्वाच्या जलमार्गावरील व्यापार कुठल्याही अडथळ्याशिवाय सुरू रहावा यासाठी इराणवर दबाव आणायला हवा. हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यास, वाशिंग्टन युरोप आणि आखाती देशांमधील आपल्या मित्रराष्ट्रांवर होर्मुजचा मार्ग मोकळा करण्यासाठी दबाव वाढवेल. 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांच्याकडे लष्करी पर्याय उपलब्ध आहेत, मात्र ते सध्या त्यांच्या प्राधान्यक्रमात नाहीत. युद्धाच्या सुरुवातीपासून, ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनी संदर्भात अनेक परस्परविरोधी विधाने केली आहेत. यापूर्वी, त्यांनी इराणला इशारा दिला होता की, जर त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

ट्रम्प यांनी, अलीकडेच सोशल मीडियावर पोस्ट करत, "इराणच्या सरकारशी आपली चर्चा सुरू आहे. मात्र, लवकरात लवकर कुठल्याही प्रकारची सहमती झाली नाही आणि होर्मुजचा मार्ग खुला केला गेला नाही, तर इराणच्या तेल विहिरी उडवून देण्याचा इशाराही त्यांनी दिला. एवढेच नाही तर, इराणचे वीज प्रकल्प, लष्करी तळ आणि खारे पाणी गोड करणारे 'डीसॅलिनेशन प्लांट' देखील लक्ष्य केले जातील, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Iran U-turn: From Destruction to Hormuz Strait Retreat

Web Summary : Trump softens stance on Iran, prioritizing naval weakening over Strait closure. US seeks diplomatic pressure, potentially involving allies, to ensure Hormuz trade flow. Military action is a lower priority.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणWarयुद्ध