इराणविरुद्धचे युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर; जेडी व्हान्स यांनी दिले मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 09:29 IST2026-03-29T09:06:38+5:302026-03-29T09:29:32+5:30

व्हान्स यांनी असेही सांगितले की, भविष्यात पुन्हा अशा कारवाईची गरज टाळण्यासाठी अमेरिकी प्रशासन आपली मोहीम काही काळ सुरू ठेवेल. त्यांनी याला दीर्घकाळ चालणारे युद्ध टाळण्याच्या उद्देशाने आखलेली एक रणनीती म्हटले.

Will the war against Iran stop? Donald Trump on the backfoot; JD Vance gave a big hint | इराणविरुद्धचे युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर; जेडी व्हान्स यांनी दिले मोठे संकेत

इराणविरुद्धचे युद्ध थांबणार? डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर; जेडी व्हान्स यांनी दिले मोठे संकेत

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. 'अमेरिकेला इराणमधील दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी संघर्षात अडकण्यात रस नाही आणि त्यांना तेथील आपली मोहीम लवकरच संपवून तेथून बाहेर पडायचे आहे, असे संकेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी दिले. एका पॉडकास्ट मुलाखतीत व्हान्स म्हणाले की, अमेरिकेचे ध्येय इराणमधील आपले काम पूर्ण करणे आहे, तिथे एक-दोन वर्षे थांबणे नाही.

अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे तेहरान हादरले! हुथी बंडखोरही संघर्षात उतरले; तेल अवीववर क्षेपणास्त्रे डागली

"आम्ही एक-दोन वर्षांचे नियोजन करत नाही आहोत. आम्ही आमचे काम करत आहोत आणि लवकरच तिथून निघून जाऊ, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाकडे अमेरिकेच्या धोरणातील मर्यादित आणि जलद लष्करी हस्तक्षेपाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.

भविष्यात पुन्हा अशा कारवाईची गरज टाळण्यासाठी अमेरिकी प्रशासन आपली मोहीम काही काळ सुरू ठेवेल, असेही व्हान्स यांनी सांगितले. त्यांनी याला दीर्घकाळ चालणारे युद्ध टाळण्याच्या उद्देशाने आखलेली एक रणनीती म्हटले. दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यावर इंधनाच्या किमती कमी होतील, असा दावा केला आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा जागतिक तेल बाजार आणि पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर थेट परिणाम झाला आहे.

मुदत आता ६ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली

जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील संभाव्य हल्ले १० दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत आता ६ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले की, हा निर्णय इराणच्या विनंतीवरून घेण्यात आला असून दोन्ही देशांमधील चर्चा खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे.

दरम्यान, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी शेजारी देशांना कडक इशारा दिला असून, इराणविरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी आपल्या भूभागाचा वापर होऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, त्यांना हा एक संदेश मानला जात आहे. पेझेश्कियन यांनी हेही स्पष्ट केले की, इराण कोणत्याही प्रकारच्या पूर्वनियोजित हल्ल्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु जर त्याच्या पायाभूत सुविधांवर किंवा आर्थिक केंद्रांवर हल्ला झाला, तर तो जोरदार प्रत्युत्तर देईल.

Web Title : ईरान युद्ध रुकेगा? ट्रंप पीछे हटे; वैंस ने दिए संकेत, अमेरिका निकलेगा

Web Summary : अमेरिका ईरान में अपना मिशन जल्द खत्म कर सकता है, वैंस का संकेत, सीमित सैन्य भागीदारी। ट्रंप ने ईरान के बुनियादी ढांचे पर हमले 6 अप्रैल तक टाले। ईरान ने सैन्य कार्रवाइयों में मदद के खिलाफ पड़ोसियों को चेतावनी दी।

Web Title : Iran War Halt? Trump Backs Down; Vance Signals US Exit

Web Summary : US may soon end its Iran mission, says Vance, signaling limited military involvement. Trump postponed Iran infrastructure attacks to April 6 after discussion. Iran warns neighbors against aiding military actions.