इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:09 IST2026-03-10T10:08:38+5:302026-03-10T10:09:21+5:30

"युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवू," असे इराणने म्हटल आहे.

Will the Iran-US conflict flare up again We will decide when to end the war, not America Iran direct response to Trump warning | इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा

इराण-अमेरिका संघर्ष आणखी पेटणार?  "युद्ध कधी संपवायचं हे आम्ही ठरवणार, अमेरिका नाही...!"; इराणचा थेट इशारा

मध्यपूर्वेतील तणाव सध्या तरी निवळेल असे चित्र नाही. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी इराणमधीलयुद्ध लवकरच संपेल, असे विधान केले होते. मात्र, त्यांच्या या विधानावर थेट प्रत्युत्तर देताना, "युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नाही, तर आम्ही ठरवू," असे इराणने म्हटल आहे.

इराण थेटच बोलला - 
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयआरजीसीने म्हटले आहे की, "युद्धाचा शेवट आम्ही ठरवू. या भागातील राजकीय समीकरणे आणि भविष्यातील परिस्थिती आता आमच्या सैन्याच्या हातात आहे. अमेरिकन सैन्य हे युद्ध संपवू शकत नाही." इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या भागातील लष्करी वर्चस्वाची लढाई आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते डोनल्ड ट्रम्प -
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, "इराणविरुद्धचे युद्ध हे अत्यंत कमी कालावधीचे असू शकते. पण, जर इस्लामिक रिपब्लिकने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणला, तर ही लढाई अधिक भीषण होऊ शकते. असा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर इराणची ही प्रतिक्रिया आली आहे.

जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर... -
मियांमी येथील आपल्या गोल्फ क्लबमध्ये रिपब्लिकन खासदारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, "काही अनिष्ट गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण मध्यपूर्वेचा एक छोटासा दौरा केला. तो अल्पकाळाचाच असेल, असे मला वाटते." यानंतर त्यांनी सोशल मीडियावरही एक पोस्ट केली होती. त्यात, "जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांपेक्षा वीस पटीने अधिक तीव्र कारवाई अथवा हल्ले करेल," असा इशारा देण्यात आला होता.
 

Web Title : ईरान की अमेरिका को चेतावनी: युद्ध कब खत्म करना है, यह हम तय करेंगे!

Web Summary : ईरान ने ट्रंप के युद्ध जल्दी खत्म होने के दावे को खारिज किया, कहा युद्ध कब खत्म होगा यह हम तय करेंगे। आईआरजीसी ने सैन्य प्रभुत्व की घोषणा की और ईरान की तेल आपूर्ति बाधित होने पर संघर्ष तेज करने की चेतावनी दी। ट्रंप ने 20 गुना अधिक मजबूत प्रतिक्रिया की धमकी दी।

Web Title : Iran Warns US: We Decide When War Ends, Not You!

Web Summary : Iran rebuffs Trump's claim of a quick end to conflict, asserting control over war's conclusion. IRGC declares military dominance, warning of intensified conflict if Iran's oil supply is blocked. Trump threatened a 20-fold stronger response.