शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

"परिणाम भोगावे लागतील!", इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा थरकाप उडवणारा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:26 IST

इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर आणि स्टील प्लांटवर भीषण हवाई हल्ले केले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाने आता अत्यंत भीषण आणि निर्णायक वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलनेइराणमधील महत्त्वाच्या पोलाद कारखान्यांसह अणू प्रकल्पांवर धडाधड क्षेपणास्त्रे डागत इराणला मोठा दणका दिला आहे. या हल्ल्यांनंतर इराण कमालीचा संतापला असून, "या कृत्यासाठी इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा थेट इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिला आहे.

अणू प्रकल्पांवर इस्रायलचा सर्जिकल स्ट्राईक

इस्रायली लष्कराने या हल्ल्यांची पुष्टी केली असून, या मोहिमेला 'ऑपरेशन रायझिंग लायन' असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत इराणच्या 'अराक हेवी वॉटर प्लांट' आणि 'यजद' येथील युरेनियम प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या मते, हे प्रकल्प अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत होते, त्यामुळे त्यांना नष्ट करणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक होते.

कारखान्यांमध्ये हाहाकार; जीवितहानीची भीती

केवळ अणू प्रकल्पच नव्हे, तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलाद कारखान्यांवरही बॉम्बवर्षाव करण्यात आला आहे. इस्फहानमधील 'मोबारेकेह स्टील प्लांट'वर झालेल्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. खुजेस्तानमधील एका कंपनीत १६ कर्मचारी जखमी झाले असून फिरोजाबादची खाण आणि मशहद विमानतळाच्या गोदामांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमुळे इराणमध्ये भीतीचे सावट पसरले असून ठिकठिकाणी आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत.

ट्रम्प यांच्यावर इराणची आगपाखड

इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही कडाडून टीका केली आहे. "एकीकडे कूटनीतिक चर्चेसाठी वेळ वाढवून द्यायचा आणि दुसरीकडे शांततेच्या प्रयत्नांना हरताळ फासत भीषण हल्ले करायचे, हे निंदनीय आहे," असे अराघची यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे आता शांतता चर्चेची शक्यता मावळली असून संपूर्ण आखाती प्रदेश महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे.

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर