मोज्तबा खामेनेई घेणार पिता अयातुल्ला यांची जागा? इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार करणार, इस्रायलचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:25 IST2026-03-05T04:24:50+5:302026-03-05T04:25:20+5:30

दुबई : अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई ...

Will Mojtaba Khamenei succeed his father Ayatollah? Will also kill Iran's new supreme leader, Israel warns | मोज्तबा खामेनेई घेणार पिता अयातुल्ला यांची जागा? इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार करणार, इस्रायलचा इशारा

मोज्तबा खामेनेई घेणार पिता अयातुल्ला यांची जागा? इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार करणार, इस्रायलचा इशारा

दुबई : अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्यानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई यांची आता त्या पदावर निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी याआधी कोणतेही सरकारी पद भूषविलेले नाही. इस्रायलनेइराणमध्ये आणखी जोरदार हवाई हल्ले केले. इराणने त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल व अन्य ठिकाणी हल्ले चढविले. या युद्धात इराणमध्ये आजवर १,०४५ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अयातुल्ला यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई हे शनिवारीनंतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आलेले नाहीत. आपल्या वडिलांनंतर त्यांच्या पदावर मोज्तबा यांची निवड करण्यास पूर्वी अनेकांचा विरोध होता. इराणमध्ये राजेशाहीप्रमाणे धर्माधिष्ठीत सत्तेतही वंशवाद बोकाळेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता युद्धाच्या काळात मोज्तबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यास त्याला फारसा विरोध होण्याची शक्यता नाही. त्यांची पत्नी झहरा हद्दाद आदेल अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाली होती. इराणमधील ८८ सदस्यांची तज्ज्ञ परिषद (असेंब्ली ऑफ एक्स्पर्ट) ही अयातुल्ला खामेनेई यांच्यानंतर नवीन सर्वोच्च नेता निवडणार आहे. (वृत्तसंस्था)

तेहरान, लेबनॉनमध्येही झाले हल्ले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणविरोधातील युद्धात आतापर्यंत ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही लोकांकडे इराणमधील भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. हे युद्ध चार ते पाच आठवडे किंवा त्याहून अधिक काळ चालण्याची शक्यता ट्रम्प यांनी याआधीच व्यक्त केली आहे. मंगळवारी तेहरानमध्ये तसेच लेबनॉनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाविरोधात प्रतिहल्ले केल्याचे सांगण्यात आले. सौदी अरेबियातील अमेरिकन दुतावास व यूएईतील अमेरिकन वाणिज्य दुतावासावर ड्रोन हल्ले झाले. इस्रायलमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार करणार
इस्रायलला नष्ट करण्याच्या हेतूने जर इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याने पावले टाकली तर त्यालाही ठार मारले जाईल, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी बुधवारी दिला. अमेरिका, इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. त्यानंतर आता तो देश नवा सर्वोच्च नेता निवडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्झ यांनी हे उद्गार काढले आहेत. 

खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असे इराणने जाहीर केले होते. कात्झ यांनी सांगितले की, इराणच्या दहशतवादी शासनाद्वारे नेमलेल्या व इस्रायलला नष्ट करण्यासाठी पावले उचलणाऱ्या प्रत्येक नेत्याला ठार मारले जाईल. अशा नेत्याचे नाव काय आहे, तो कुठे दडून बसला आहे यामुळे आमच्या मोहिमेमध्ये काहीही फरक पडणार नाही. तसे आदेश इस्रायलच्या पंतप्रधानांनी लष्कराला दिले आहेत.

Web Title : खामेनेई के बेटे उत्तराधिकारी? इजरायल की ईरान के नेता को धमकी।

Web Summary : अयातुल्ला खामेनेई की मौत के बाद, उनके बेटे मोज़तबा उत्तराधिकारी हो सकते हैं, हालांकि पहले विरोध था। इजरायल ने ईरान के किसी भी नेता को धमकी दी है जो इजरायल को धमकी देगा। ईरान, लेबनान और इजरायल में संघर्ष में हताहत हुए। ट्रम्प ने ईरान युद्ध में 800 मौतों का दावा किया।

Web Title : Khamenei's Son to Succeed? Israel Threatens New Iranian Leader.

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, his son Mojtaba is likely to succeed him, though facing prior opposition. Israel warns any new Iranian leader threatening Israel will be targeted. The conflict has resulted in casualties and attacks in Iran, Lebanon, and Israel. Trump claims 800 deaths in Iran war.