इराणच्या नौदलाचे अस्तित्व मिटवणार? अमेरिकेचा समुद्रात थरार; महाकाय ड्रोन कॅरिअर युद्धजहाज उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:29 IST2026-03-06T09:28:35+5:302026-03-06T09:29:24+5:30

शुक्रवारी अमेरिकन सैन्याने इराणच्या एका महाकाय ड्रोन कॅरिअर जहाजाला लक्ष्य करत त्याला आग लावून दिली.

Will Iran's Navy be wiped out? America's thrill at sea; Giant drone carrier warship destroyed! | इराणच्या नौदलाचे अस्तित्व मिटवणार? अमेरिकेचा समुद्रात थरार; महाकाय ड्रोन कॅरिअर युद्धजहाज उद्ध्वस्त!

इराणच्या नौदलाचे अस्तित्व मिटवणार? अमेरिकेचा समुद्रात थरार; महाकाय ड्रोन कॅरिअर युद्धजहाज उद्ध्वस्त!

मध्य-पूर्वेतील युद्ध आता शिगेला पोहोचले असून अमेरिकेने इराणच्या नौदलाला मुळासकट उखडून टाकण्याचा विडा उचलला आहे. शुक्रवारी अमेरिकन सैन्याने इराणच्या एका महाकाय ड्रोन कॅरिअर जहाजाला लक्ष्य करत त्याला आग लावून दिली. दुसऱ्या महायुद्धातील विमानवाहू नौकेइतका मोठा आकार असलेले हे जहाज सध्या समुद्रात जळत असून, इराणसाठी हा अत्यंत मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

७ दिवसांपासून युद्धाचा वणवा, १ हजार बळी!

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील या भीषण संघर्षाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सात दिवसांत दोन्ही बाजूंकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १००० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त करू," अशी घोषणा आधीच केली होती. त्या दिशेने अमेरिकेने आता आक्रमक पावले टाकायला सुरुवात केली आहे.

इराणचाही पलटवार; अमेरिकन टँकरवर मिसाइल डागले

अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणनेही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी इराणने पर्शियन आखातात एका अमेरिकन तेलवाहू टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला चढवला. अमेरिकेने श्रीलंकेजवळ इराणची एक बुडवली होती, ज्यामध्ये ८७ इराणी नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठीच इराणने अमेरिकन टँकरला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.

३० पेक्षा जास्त जहाजे जलसमाधी!

यू.एस. सेंटकॉमच्या कमांडरने दावा केला आहे की, अमेरिकेने आतापर्यंत इराणची ३० हून अधिक युद्धजहाजे समुद्रात बुडवली आहेत. यामध्ये इराणच्या ताफ्यातील अत्याधुनिक ड्रोन जहाजांचाही समावेश आहे. नौदलाचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे इराणची सागरी ताकद आता धोक्यात आली आहे.

इराणनंतर ट्रम्प यांचा नवा निशाणा

एकीकडे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला नवीन इशारा दिला आहे. इराणसोबतचा हा संघर्ष संपल्यानंतर अमेरिका आपले पूर्ण लक्ष 'क्युबा'वर केंद्रित करेल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या या नव्या धमकीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, युद्धाचे लोण आता इतर देशांपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title : अमेरिका का ईरानी नौसेना पर हमला: ड्रोन कैरियर नष्ट, तनाव बढ़ा

Web Summary : अमेरिका ने मध्य पूर्व में ईरानी ड्रोन कैरियर को निशाना बनाया और नष्ट कर दिया। इससे संघर्ष बढ़ गया है, जो अब सात दिनों से चल रहा है और 1000 से अधिक लोग हताहत हुए हैं। ईरान ने एक अमेरिकी टैंकर पर हमला करके जवाबी कार्रवाई की। अमेरिका ने 30 से अधिक ईरानी युद्धपोतों को डुबोने का दावा किया है और क्यूबा को चेतावनी दी है।

Web Title : US Targets Iranian Navy: Drone Carrier Destroyed, Tensions Escalate

Web Summary : The US military has reportedly targeted and destroyed a massive Iranian drone carrier in the Middle East. This escalates the conflict, now seven days long with over 1000 casualties. Iran retaliated by attacking an American tanker. The US claims to have sunk over 30 Iranian warships and warns Cuba next.