शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 21:14 IST

व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता.

वॉशिंग्टन - इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या नावाखाली ट्रम्प एक मोठा डाव खेळत आहेत. त्यांच्या या सीक्रेट प्लॅनिंगची झलक आढावा बैठकीच्या मध्यातूनच बाहेर पडलेल्या संतप्त खासदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अमेरिकी संसदेतील एका गोपनीय बैठकीत मोठा गदारोळ झाल्याचा दावा केला जात आहे. ट्रम्प इराण युद्धाच्या हेतूबाबत देशाची दिशाभूल करत आहेत असा रिपब्लिकन खासदारांनी आरोप केला आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार बैठकीतील घडामोडी इतक्या धक्कादायक होत्या की खासदारांनी त्याला 'अविश्वसनीय' म्हटलं आहे.

"आमच्याशी खोटं बोललं गेलं"- रिपब्लिकन खासदार

ट्रम्प यांचे कट्टर समर्थक माईक रॉजर्स आणि आक्रमक नेत्या नॅन्सी मेस हे पत्रकार परिषदेतून संतापून बाहेर पडले. नॅन्सी मेस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की,  अमेरिकन जनतेला जे सांगितलं जात आहे आणि आम्हाला जी माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे भिन्न लष्करी उद्दिष्ट्ये आहेत. ट्रम्प इराणवर जमिनीवरील हल्ल्याची गुप्तपणे तयारी करत आहेत अशी खासदारांना भीती आहे असं त्यांनी सांगितले.

बैठकीतील एका सूत्राने दावा केला की, अणु ठिकाणे नष्ट करणे हे यापुढे त्यांचे प्राथमिक लष्करी उद्दिष्ट राहिलेले नाही असं खासदारांना सांगण्यात आले. व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता. आता ट्रम्प  सत्तापालटासाठी जोर देत आहेत.

खार्ग बेटावर ताबा

इराणच्या तेल निर्यातीपैकी ९०% वाटा असलेले खार्ग बेट, सध्या युद्धातील सर्वात मोठे संघर्षस्थळ बनले आहे. अमेरिका तिथे सैन्य उतरवण्याची योजना आखत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संपूर्ण बेटावर एंटी पर्सनल आणि एंटी आर्मर मॉइन्सचे जाळे पसरवले आहे. या जमिनीवरील कारवाईमुळे मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिकांचा मृत्यू होऊ शकतो असा अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, युद्ध लांबत चालल्याने ट्रम्प प्रशासन काँग्रेसकडे २०० अब्ज डॉलर्स (अंदाजे १६ लाख कोटी रुपये) इतक्या अतिरिक्त निधीची मागणी करण्याच्या तयारीत आहे. ही रक्कम पेंटागॉनच्या संपूर्ण वार्षिक अर्थसंकल्पाच्या एक-पंचमांश आहे. रिपब्लिकन खासदार आता या प्रचंड खर्चावर आणि अनिश्चित युद्धावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Iran Plan Sparks Republican Revolt: Secret Meeting Fallout

Web Summary : Trump's Iran strategy faces Republican backlash after a secret meeting revealed potential ground invasion plans and a shift towards regime change. Concerns rise over military objectives, Kharg Island conflict, and a massive $200 billion funding request for the escalating war, fueling dissent within the party.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प