अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:57 IST2026-01-11T16:54:54+5:302026-01-11T16:57:12+5:30

आर्थिक संकट आणि राजवटीविरुद्ध असंतोष यामुळे इराणमध्ये सुरू असलेले निदर्शने देशभर पसरली आहेत.

Will America take major action in Iran? Israel has input, country on alert | अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क

अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क

इराणमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेबाबत इस्रायल सतर्क झाले आहेत. इस्रायली सुरक्षा सल्लागारांनी परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपासून इराणमध्ये हस्तक्षेप करण्याची धमकी दिली आहे. निदर्शकांवर बळाचा वापर करण्याविरुद्ध इशारा दिला आहे. अमेरिका मदत करण्यास तयार आहे. जूनमध्ये इस्रायल आणि इराणमध्ये १२ दिवसांचे युद्ध झाले होते, यामध्ये अमेरिकेने इस्रायलसह हवाई हल्ले देखील केले होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची शिखर स्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलला इराणच्या अणुकार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांबद्दल सतत चिंता असते.

“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी फोनवरून इराणमध्ये अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपाबाबत चर्चा केली. एका इस्रायली सूत्रांनी याची पुष्टी केली, तर एका अमेरिकन अधिकाऱ्याने संभाषणाची पुष्टी केली परंतु विषय उघड केले नाहीत. इस्रायलने अजूनही इराणमधील निदर्शनांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. जर इराणने इस्रायलवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे नेतन्याहू यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. 

इराणमध्ये निदर्शने

इस्रायली सूत्रांनी वाढत्या सतर्कतेबद्दल तपशीलवार माहिती दिली नाही, परंतु परिस्थिती गांभीर्याने घेतली जात आहे हे स्पष्ट आहे. आर्थिक संकट आणि राजवटीविरुद्ध असंतोषामुळे इराणमध्ये सुरू असलेले निदर्शने देशभर पसरली आहेत. इंटरनेट बंद असूनही, सोशल मीडियावर व्हिडीओ समोर येत आहेत. निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत आणि सुरक्षा दलांशी संघर्ष करत आहेत. ट्रम्प प्रशासनाने हस्तक्षेप करण्याच्या वारंवार आवाहनामुळे इराणी नेतृत्वात अस्वस्थता वाढली आहे. इस्रायल आणि अमेरिकेतील जवळीक प्रादेशिक तणाव आणखी वाढवू शकते. इराणचे सर्वोच्च नेते आणि अधिकाऱ्यांनी निदर्शकांना तोडफोड करणारे म्हणून वर्णन केले आहे, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 

Web Title : क्या अमेरिका ईरान पर करेगा बड़ी कार्रवाई? तनाव के बीच इजराइल सतर्क

Web Summary : ईरान में संभावित अमेरिकी हस्तक्षेप की आशंकाओं के बीच इजराइल सतर्क है। इजराइल और अमेरिकी अधिकारियों के बीच ईरान के परमाणु कार्यक्रम, विरोध प्रदर्शनों और क्षेत्रीय अस्थिरता पर चर्चा हुई। इजराइल ने सीधे हस्तक्षेप व्यक्त नहीं किया है, लेकिन हमले की स्थिति में गंभीर परिणाम की चेतावनी दी है।

Web Title : US to Act Against Iran? Israel Alert Amid Rising Tensions

Web Summary : Israel is on alert amid concerns of potential US intervention in Iran. Discussions between Israeli and US officials have taken place, focusing on Iran's nuclear program, protests, and regional instability. Israel has not expressed direct intervention, but warns of consequences if attacked.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.