अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला भीषण हल्ल्याची धमकी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेचे विमानवाहू जहाज 'USS अब्राहम लिंकन' तसेच, USS फ्रँक ई. पीटरसन ज्यूनिअर, USS स्प्रुअंस आणि USS माइकल मर्फी ही विनाशकारी जहाजेही (Destroyers) आधीच या भागात तैनात झाली आहेत. "इराणने अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर चर्चेच्या टेबलावर यावे, अन्यथा पुढचा हल्ला अत्यंत भीषण असेल," अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांच्या धमकी नंतर, इराणनेही पलटवार केला आहे. तसेच, हल्ला झाल्यास अमेरिकेलाही परिणाम भोगावे लागतील, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले, "इराण लवकरात लवकर टर्चेच्या टेबलावर येईल. आणि निष्पक्ष तसेच योग्य डील होईल. कुठलेही अण्वस्त्र नाही. एक असा करार जो सर्वांसाठीच चांगला असेल. हे अत्यंत आवश्यक आहे. इराणकडे अण्वस्त्र असूच शकत नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्टपणे लिहिले आहे.
यातच, भू-राजकीय तज्ज्ञ स्टेनली जॉनी यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणचे अण्वस्त्र प्रकल्प नष्ट केल्याचा दावा केला होता. जर प्रकल्प तेव्हाच नष्ट झाले असतील, तर मग आता जानेवारी २०२६ मध्ये पुन्हा अणुकरारासाठी दबाव का टाकला जात आहे? एढेच नाही तर, अमेरिकेचा खरा रस मानवाधिकारात नाही, तर सत्तेच्या गणितात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या धमकीला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार अली शामखानी म्हणाले, "अमेरिकेच्या कोणत्याही लष्करी कारवाईचा परिणाम अमेरिका आणि इस्रायलला भोगावा लागेल." इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनीही सैन्य पूर्णपणे सज्ज असून आमची बोटे 'ट्रिगर'वर आहेत, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर, इराण नेहमीच आपल्या शांततापूर्ण अणुतंत्रज्ञानाच्या हक्कांचे रक्षण करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : US-Iran relations worsen as Trump threatens Iran over nuclear issues. American warships are deployed. Iran warns of retaliation, stating they're ready to defend their nuclear rights. Experts question US motives behind the renewed pressure.
Web Summary : ट्रम्प ने ईरान को परमाणु मुद्दे पर धमकी दी, जिससे अमेरिका-ईरान संबंध बिगड़े। अमेरिकी युद्धपोत तैनात। ईरान ने जवाबी कार्रवाई की चेतावनी दी, कहा परमाणु अधिकारों की रक्षा करेंगे। विशेषज्ञों ने अमेरिकी मंशा पर सवाल उठाए।