जगाच्या नकाशावर इराण आणि ओमानच्या दरम्यान असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' सध्या जागतिक राजकारणाचे केंद्र बनली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकन सैन्य होर्मुझमध्ये उतरणार नाही. वरवर हे विधान साधे वाटत असले, तरी त्यामागे एक भीषण वास्तव दडलेले आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ हे अमेरिकन सैनिकांसाठी 'डेथ ट्रॅप' ठरू शकते आणि हीच भीती ट्रम्प यांच्या निर्णयामागे आहे.
का आहे होर्मुझ इतके धोकादायक?
भूगोलाची इराणला साथ: होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत अरुंद आणि उथळ आहे. भौगोलिकदृष्ट्या हे ठिकाण इराणच्या बाजूने झुकलेले आहे. या अरुंद पट्ट्यात अमेरिकेच्या अवाढव्य युद्धनौका नेणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. पाण्याचे उथळपण आणि आजूबाजूचा डोंगराळ भाग यामुळे इराणला गनिमी काव्याने हल्ला करणे सोपे जाते.
एका छोट्या ड्रोनचाही मोठा धोका: अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार डेन केन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या सादरीकरणात एक धक्कादायक माहिती दिली. या अरुंद भागात अमेरिकेची एखादी मोठी युद्धनौका अडकली, तर इराणचा एक साधा 'कामिकाझे' ड्रोनही ती उद्ध्वस्त करू शकतो. जर जगातील सर्वात शक्तिशाली देशाची युद्धनौका अशा प्रकारे बुडाली, तर ती अमेरिकेसाठी मोठी नाचक्की ठरेल.
लँडिंग करताच मृत्यूचे सावट: निवृत्त मरीन कर्नल मार्क कॅन्सियन यांच्या मते, होर्मुझच्या किनाऱ्यावर अमेरिकन सैनिकांनी पाऊल ठेवताच त्यांना इराणच्या मोठ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागेल. या मोहिमेत सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैनिक मारले जाण्याची शक्यता आहे. विअतनाम आणि अफगाणिस्तान युद्धात भूगोलाचा अंदाज न आल्याने अमेरिकेचे जे हाल झाले, त्याची पुनरावृत्ती ट्रम्प यांना नको आहे.
निवडणुकीचे गणित आणि लष्करी खर्च: अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस मध्यावधी निवडणुका होणार आहेत. जर होर्मुझमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, तर ट्रम्प यांच्या राजकारणाला मोठा फटका बसू शकतो. तसेच, या युद्धात आतापर्यंत ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झाला आहे. केवळ होर्मुझवर नियंत्रण मिळवून इराणमधील सत्तापालट करणे शक्य नाही, हे अमेरिकेला समजले आहे.
ट्रम्प यांचा 'क्लीन कट' संदेश: "ज्या देशांना तेलाची गरज आहे, त्यांनी स्वतः होर्मुझमध्ये जावे आणि आपला रस्ता मोकळा करावा," असे म्हणत ट्रम्प यांनी जबाबदारी झटकली आहे. अमेरिकन जवानांचे प्राण धोक्यात घालून इतरांसाठी तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास ट्रम्प सध्या तयार नाहीत.
Web Summary : Hormuz Strait's geography favors Iran, making it perilous for the US military. Drones pose a significant threat to warships. Potential high casualties and election concerns influenced Trump's decision to avoid conflict. He wants oil-dependent nations to secure their own passage.
Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य की भौगोलिक स्थिति ईरान के पक्ष में है, जो अमेरिकी सेना के लिए खतरनाक है। ड्रोन युद्धपोतों के लिए खतरा हैं। संभावित उच्च हताहतों और चुनाव संबंधी चिंताओं ने ट्रम्प के संघर्ष से बचने के निर्णय को प्रभावित किया। वह चाहते हैं कि तेल पर निर्भर राष्ट्र अपना मार्ग सुरक्षित करें।