गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:45 IST2025-08-19T14:45:20+5:302025-08-19T14:45:39+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गाझामध्ये कुपोषण आणि उपासमारीमुळे कोणी मरत नाही असे आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार सांगत असले, तरी गाझाची भयावह वास्तविकता काही वेगळीच आहे.

Why is this dangerous disease spreading so rapidly in Gaza? Treatment is impossible; Doctors' headaches increase! | गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!

गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू गाझामध्ये कुपोषण आणि उपासमारीमुळे कोणी मरत नाही असे आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार सांगत असले, तरी गाझाची भयावह वास्तविकता काही वेगळीच आहे. इथले लोक केवळ भुकेनेच नाही, तर कुपोषणामुळे होणाऱ्या गंभीर आजारांचेही शिकार होत आहेत. सध्या गाझामध्ये एक धोकादायक व्हायरस पसरत आहे, ज्यामुळे 'पॅरालिसिस' (लकवा) सारखे गंभीर आजार होत आहेत. लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिकच भीतीदायक आहे, कारण सततच्या उपासमारीमुळे त्यांच्या शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाली आहे.

'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस'चे वाढते रुग्ण

गाझाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. या सिंड्रोममुळे स्नायू अचानक कमकुवत होतात आणि रुग्णाला श्वास घेण्यास आणि अन्न गिळण्यासही त्रास होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे गाझाची सांडपाणी आणि स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, ज्यामुळे अशा संसर्गजन्य आजारांचा फैलाव होत आहे.

दोन वर्षांत रुग्णांची संख्या वाढली!

‘पोलिटिको’च्या एका बातमीनुसार, ऑक्टोबर २०२३ पूर्वी हा आजार खूप दुर्मिळ होता आणि वर्षाला फक्त १२ प्रकरणे समोर येत होती. पण गेल्या तीन महिन्यांत जवळपास १०० नवीन रुग्ण आढळले आहेत. जॉर्डन आणि इस्रायलमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्ये एंटरोव्हायरसची पुष्टी झाली आहे. हा व्हायरस दूषित पाणी आणि अस्वच्छतेतून पसरतो. खान युनिसच्या गल्ल्यांमध्ये घाण पाणी आणि सांडपाण्याचा साठा सामान्य झाला आहे. सोबतच ‘गिलियन-बारे सिंड्रोम’ची प्रकरणेही वेगाने वाढत आहेत.

मुलांवर सर्वात मोठा परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), ३१ जुलैपर्यंत १५ वर्षांखालील मुलांमध्ये या आजाराची ३२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, यामागचे कारण आरोग्याची कोलमडलेली सेवा, कुपोषण आणि अस्वच्छता आहे. यावर्षी तपासणी केलेल्या सुमारे ७०% नमुन्यांमध्ये ‘नॉन-पोलिओ एंटरोव्हायरस’ आढळला आहे, तर यापूर्वी हे प्रमाण फक्त २६% होते.

उपचार नाही, औषधांची टंचाई

डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार करण्याचे पर्याय जवळजवळ नाहीत. गाझामधील अल-शिफा रुग्णालयात, जे २०२४च्या सुरुवातीला इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले, तेथे ‘गिलियन-बारे सिंड्रोम’ची २२ प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला असून, १२ मुलांना कायमचा 'लकवा' झाला आहे. या आजारासाठी ‘इंट्रावेनस इम्युनोग्लोब्युलिन’ आणि ‘प्लाझ्मा एक्सचेंज’ सारख्या आधुनिक उपचारांची गरज असते. पण इस्रायलच्या नाकेबंदीमुळे गाझामध्ये या औषधांची आणि उपचाराच्या मशीनची मोठी कमतरता आहे.

Web Title: Why is this dangerous disease spreading so rapidly in Gaza? Treatment is impossible; Doctors' headaches increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.