अमेरिका ठरला स्वत:च्याच ट्रेनिंगचा बळी, व्हाईट हाऊस गोळीबार करणाऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:18 IST2025-11-27T14:11:30+5:302025-11-27T14:18:25+5:30
White House Firing Attacker Updates: हल्लेखोर रहमानउल्लाह लकनवाल बाबत अशी गोष्ट समजली ज्यामुळे अमेरिका डोक्याला हात लावून घेईल

अमेरिका ठरला स्वत:च्याच ट्रेनिंगचा बळी, व्हाईट हाऊस गोळीबार करणाऱ्याबद्दल धक्कादायक खुलासा
White House Firing Attacker Updates: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ बुधवारी संध्याकाळी नॅशनल गार्डच्या सैनिकांना लक्ष्य करून गोळीबार झाला. नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेनंतर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले. FBIच्या नुसार, हल्लेखोराची ओळख २९ वर्षीय रहमानउल्लाह लकनवाल अशी आहे. तो मूळचा अफगाणिस्तानचा आहे. या घटनेला तात्काळ प्रतिसाद देत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हटले आहे आणि सांगितले आहे की, या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना मोठी किंमत मोजावी लागेल. त्याच हल्लेखोराबद्दल आता अधिक माहिती समोर आली आहे, जी अधिक धक्कादायक आहे.
हल्लेखोर आधी होता सैनिक, घेतलेले अमेरिककडून ट्रेनिंग
अहवालानुसार, रहमानउल्लाह लकनवाल ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेत आला. त्याने २०२४ मध्ये निर्वासित दर्जासाठी अर्ज केला आणि त्यावर्षी त्याच्या अर्जाला मंजुरी मिळाली. अहवालांनुसार, लकनवाल पूर्वी अफगाणिस्तानच्या युनिट ०१ मध्ये सैनिक म्हणून तैनात होता. या युनिटची स्थापना, प्रशिक्षण आणि सुसज्जता अमेरिकन गुप्तचर संस्थांनी केली होती. अहवालांनुसार, या युनिटचे अनेक सदस्य सध्या मानसिक तणावात असून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत, ज्यामुळे कधीकधी आत्महत्या आणि इतरांवर हल्ले अशा घटना घडल्या आहेत.
ही घटना कधी आणि कशी घडली?
हा हल्ला फारागुट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ झाला. लकनवाल काही वेळ तिथे वाट पाहत होता आणि अचानक पहाटे २:१५ वाजताच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, लकनवालने प्रथम एका महिला रक्षकाच्या छातीत आणि नंतर डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने दुसऱ्या रक्षकावर गोळीबार केला. जवळच असलेल्या तिसऱ्या रक्षकाने लकनवालवर चार गोळ्या झाडल्या, ज्याला शांत करण्यात आले. हल्लेखोराला जवळजवळ नग्न अवस्थेत रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
५०० नॅशनल गार्ड पाठवण्याचे आदेश
अमेरिकेचे न्याय विभाग या प्रकरणाची चौकशी दहशतवादी हल्ला म्हणून करत आहे. हल्ल्यानंतर, अध्यक्ष ट्रम्प यांनी पेंटागॉनला वॉशिंग्टन डीसीमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी ५०० अतिरिक्त नॅशनल गार्ड सैनिक पाठवण्याचे निर्देश दिले. ट्रम्प म्हणाले की, गुन्हेगारांना मोठी किंमत मोजावी लागेल.