शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

व्हाईट हाऊस गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कठोर निर्णय, व्हिसाची प्रक्रियाच थांबवली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 09:30 IST

Donald Trump White House firing Updates: अमेरिकेच्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार झाल्यापासून ट्रम्प प्रचंड संतापल्याचे दिसत आहे.

White House firing Updates: अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड्सना लक्ष्य करून गोळीबार झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. हल्लेखोर संशयित अफगाणिस्तानचा नागरिक आहे. त्याची ओळखदेखील पटवण्यात आली. विशेष म्हणजे, अमेरिकन एजन्सीने अफगाणिस्तानात त्यांच्या काही लोकांना सैन्याचे ट्रेनिंग दिले होते. त्यापैकीच एकाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आता अमेरिकेने अफगाण नागरिकांवर कारवाई केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सांगितले की, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अफगाण पासपोर्टसह प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी व्हिसा जारी करणे निलंबित केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये रुबियो यांनी लिहिले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र विभागाने अफगाण पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या सर्व व्यक्तींना व्हिसा देणे थांबवले आहे. आपल्या लोकांचे संरक्षण करणे हे अमेरिकेचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

स्थलांतरितांची तपासणी होणार

यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने प्रत्येक स्थलांतरिताची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासली जाईपर्यंत आणि त्याची तपासणी होईपर्यंत सर्व आश्रय देण्यासंबंधित निर्णय थांबवले आहेत, असे USCIS संचालक जोसेफ अल्डो यांनी सांगितले. २९ नोव्हेंबर रोजी X वर एका पोस्टमध्ये अल्डोने लिहिले की, प्रत्येक परदेशी व्यक्तीची तपासणी केली जाईल. सर्व गोष्टींची खात्री होईपर्यंत USCIS ने सर्व आश्रय निर्णय थांबवले आहेत. अमेरिकन जनतेची सुरक्षा नेहमीच सर्वप्रथम असेल.

गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प 'अँक्शन मोड'मध्ये...

२६ नोव्हेंबरला व्हाईट हाऊसजवळ रहमानउल्लाह लकनवाल नावाच्या अफगाण नागरिकाने दोन नॅशनल गार्ड्सवर गोळीबार केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, २० वर्षीय सारा बेकस्ट्रॉम हिचा मृत्यू झाला. तर २४ वर्षीय अँड्र्यू वूल्फची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला प्रतिसाद म्हणून ट्रम्प यांनी कठोर निर्णय घेतले. त्यांनी असेही म्हटले की अमेरिका सध्या देशात असलेल्या गैर-नागरिकांना दिले जाणारे संघीय फायदे आणि अनुदाने बंद करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump halts Afghan visas after White House shooting; guard killed.

Web Summary : Following a White House shooting by an Afghan national that killed one guard, President Trump suspended visas for all Afghan passport holders. USCIS halted asylum decisions pending thorough background checks. Federal benefits for non-citizens are also being reviewed.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाFiringगोळीबारShootingगोळीबारAfghanistanअफगाणिस्तान