Viral Video: "माझी लेक कुठंय?" इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईची आर्त हाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:08 IST2026-03-19T19:07:26+5:302026-03-19T19:08:52+5:30

US-Israel Iran War: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे.

Where is my daughter? Trapped Iranian Mother Heart-Wrenching Cry Amidst Massive Israel-US Airstrikes Goes Viral | Viral Video: "माझी लेक कुठंय?" इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईची आर्त हाक!

Viral Video: "माझी लेक कुठंय?" इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईची आर्त हाक!

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. आखाती देशांमधील ऊर्जा केंद्रांवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर भीषण प्रतिहल्ला चढवला. या हवाई हल्ल्यांनी तेहरानसह इराणच्या अनेक शहरांना लक्ष्य केले असून, यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने जगाला हादरवून सोडत आहे, ज्यात इस्रायलच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेने स्वतःच्या वेदना विसरून आपली लेक कुठे आहे हे आधी विचारले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, इस्रायलच्या हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक इराणी महिला अडकल्याची दिसत आहे. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जेव्हा या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्या महिलेने दाखवलेल्या धैर्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. संबंधित महिला स्वतः मृत्युशी झुंजत असताना तिने बचाव पथकाला स्वतःला वाचवण्याची विनंती न करता, माझे बाळ कुठे आहे? माझी मुलगी सुरक्षित आहे का?, असे विचारले. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता केवळ आपल्या लेकीसाठी व्याकुळ झालेल्या या आईची हाक ऐकून बचावकर्तेही क्षणभर सुन्न झाले.

'प्रेस टीव्ही'ने या घटनेचे चित्रीकरण केले असून, हा व्हिडिओ सध्या युद्धाच्या क्रूरतेचा सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. क्षणात घरे उद्ध्वस्त होणे आणि निष्पाप कुटुंबांची वाताहत होणे, हे चित्र या व्हिडिओतून स्पष्टपणे समोर आले आहे. एकीकडे क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असताना, दुसरीकडे एका आईची आपल्या बाळासाठी चाललेली ही धडपड मानवी संवेदनेला हात घालणारी आहे

इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणमधील अनेक निवासी भागांचे रूपांतर ढिगाऱ्यात झाले आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक नागरिक अडकले असण्याची शक्यता असून बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. या ताज्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.

Web Title : वायरल वीडियो: इजरायली हमले में माँ की बेटी के लिए चीख

Web Summary : ईरान पर इजरायली हमलों के बीच, एक वायरल वीडियो में मलबे में दबी एक माँ अपनी जान से पहले अपनी बेटी की सुरक्षा को प्राथमिकता देती है। हमलों में आवासीय क्षेत्र तबाह हो गए, जिससे वैश्विक चिंता बढ़ गई। बचाव कार्य जारी है।

Web Title : Viral Video: Mother's desperate cry for daughter amid Israeli strikes.

Web Summary : Amidst Israeli strikes on Iran, a viral video shows a mother trapped under rubble, prioritizing her daughter's safety over her own. The strikes targeted residential areas, causing widespread devastation and sparking global concern. Rescue operations are underway.