युद्धाचा 'THE END' केव्हा? तारीख 'कंफर्म', उलटगणती सुरू! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली 'डेडलाईन', स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:18 IST2026-04-01T12:18:02+5:302026-04-01T12:18:54+5:30
ट्रम्प यांचे हे विधान खरे ठरले तर साधारणपणे २१ एप्रिलपर्यंत हा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो...

युद्धाचा 'THE END' केव्हा? तारीख 'कंफर्म', उलटगणती सुरू! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली 'डेडलाईन', स्पष्टच बोलले
अमेरिका-इस्रायल आणि ईराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध आता फार काळ चालणार नाही, असे संकेत दिले आहेत. पुढील २ ते ३ आठवड्यांत, हा संघर्ष संपुष्टात येईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे विधान खरे ठरले तर साधारणपणे २१ एप्रिलपर्यंत हा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपले बहुतांश लष्करी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता हे युद्ध सुरू ठेवण्याचे कुठलेही ठोस कारण शिल्लक राहिलेले नाही, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले ट्रम्प -
इराण युद्धासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिका कोणत्याही औपचारिक कराराशिवाय या संघर्षातून बाहेर पडू शकते. अमेरिकेकडे या परिस्थितीत जास्त काळ राहण्याचे कोणतेही सबळ कारण नाही." कालावधीचा उल्लेख करत ते म्हणाले, "आपण शक्यतो दोन ते तीन आठवड्यांत या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो." मात्र याचवेळी, ते पुढे म्हणाले, "या काळात इराणसोबत करार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प यांच्या मते, जर तेहरानची इच्छा असेल तर या काळात करार होऊ शकतो. मात्र, युद्ध संपवण्यासाठी करार करणे अनिवार्य नाही. ट्रम्प यांच्या विधानावरून, यासंदर्भात अमेरिका लवचिक भूमिका घेत असल्याचे दिसते.
काय म्हणाले नेतन्याहू? -
दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या मोहिमेचे समर्थन केले. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमुळे ईराणची सत्ता पद्धतशीरपणे मोडीत निघत आहे. ईराणने लष्करी महत्त्वाकांक्षेवर खर्च केलेले अब्जावधी डॉलर्स पाण्यात गेले आहेत. ईराण आता कमालीचा कमकुवत झाला आहे तर इस्रायल अधिक मजबूत झाला आहे, असेही नेतन्याहू म्हणाले.