"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 19:51 IST2026-04-05T19:49:54+5:302026-04-05T19:51:49+5:30
Donal Trump on Iran: होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही पूर्णपणे खुली झालेली नसून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला नरकात पाठवण्याची धमकी दिली आहे.

"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
Donald Trump Iran war News: 'होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर इराणला नरकात पाठवेन', अशी धमकी देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चक्क शिवी दिली. ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल' या सोशल मिडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये आतापर्यंत झाला नाही, असा हल्ला मंगळवारी होणार असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मंगळवारी वीज केंद्र आणि उड्डाणपूल दिवस असेल. इराणमधील सर्व काही एकाच हल्ल्यात नष्ट केलं जाईल. हा हल्ला इतका मोठा असेल की, आतापर्यंत असा हल्ला झालेला नाही."
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली शिवी
अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणला धमकी देताना शिवीही दिली. बास्टर्ड (विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेले अपत्य) अशी शिवी देत ट्रम्प म्हणाले, "होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना नरकात राहावं लागेल. आता फक्त बघाच", असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा ही प्रमुख मागणीच ट्रम्प यांच्याकडून केली जात आहे. मात्र, होर्मुझमध्ये नाकाबंदी करत इराणने अमेरिकेची कोंडी केली आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्याकडून इराणमधील वीज निर्मिती केंद्रे, उड्डाण पूल उडवण्याची धमकी दिली गेली आहे.
अमेरिकेची दोन हेलिकॉप्टर पाडली
पश्चिम आशियातील संघर्ष चिघळलेला असतानाच इराणने अमेरिकेच्या दोन एफ-१५ विमानापाठोपाठ दोन लष्करी मोहिमांसाठी वापरली जाणारी हेलिकॉप्टरही पाडली आहेत.
#WATCH | First footage of the destruction of two Black Hawk helicopters and one C-130 Hercules enemy military transport aircraft in southern Isfahan, Iran.
— ANI (@ANI) April 5, 2026
(Source: IRIB via ANI) pic.twitter.com/XwVby4h2Z7
अमेरिकेच्या लढाऊ विमानाचा पायलट बचावला होता. त्याचा शोध घेत असलेल्या विमानांपैकी दोन हेलिकॉप्टर इराणने टिपली. त्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. त्यानंतर आता ट्रम्प यांचा थयथयाट सुरू झाला आहे.