शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचे भवितव्य काय? महाभियोगातून बचावले, पण कोर्टात खेचण्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:57 IST

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या अग्निपरीक्षेतून जाण्यापासून दुसऱ्यांदा वाचले असले तरी त्यांच्याविरोधातील असंतोष एवढा आहे की, ट्रम्प यांना कोर्टात खेचा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. अध्यक्षपदी असताना काही विशेष नियमांचे, कायद्यांचे कवच ट्रम्प यांना लाभले होते. मात्र, आता अध्यक्षपदावरून उतरल्यानंतर त्यांच्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे कारवाई केली जाऊ शकते, असा सूर उमटू लागला असून राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू झाली आहे. 

ट्रम्प यांच्यावर आरोप काय?

कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीवर हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावले, हा मुख्य आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. ६ जानेवारी रोजी हा हल्ला झाला होता. त्यात एका पोलिसासह पाच जण ठार झाले होते


ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या सात सिनेटर्सनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता.सेनेटमध्येच प्रस्ताव फेटाळला गेल्याने लोकप्रतिनिधीगृहात हा प्रस्ताव येऊ शकला नाही.

आता पुढे काय?

- ट्रम्प यांच्यावर कोर्टात खटला दाखल करता येऊ शकतो. 
- केवळ कॅपिटॉल हिलवरील हल्ला, हे एकच प्रकरण नव्हे तर अनेक प्रकरणांवरून ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
- अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान जॉर्जियातील निवडणूक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणीही ट्रम्प यांच्यावर खटला सुरू आहे.
- कॅपिटॉल हिलवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांकडूनही ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो.
- कथित आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे. 

- कॅपिटॉल हिल हल्ला प्रकरणावेळी ट्रम्प काय करत होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु याप्रकरणी आतापर्यंत शेकडो लोकांची धरपकड झाली आहे.
- माजी अध्यक्षांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे वेगवेगळ्या राज्यांत नोंद असतील तर ते एकत्रित करून मध्यवर्ती न्यायव्यवस्थेकडे वर्ग केले जाऊ शकतात. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका