मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. इराणने रविवारी (२९ मार्च २०२६) एक खळबळजनक दावा करत अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुलतान एअर बेस'वर तैनात असलेले अमेरिकेचे अत्याधुनिक AWACS (Airborne Warning and Control System) विमान मार पाडल्याचे इराणने म्हटले आहे. या विमानाला 'आकाशातील उडतं रडार' मानले जाते, जे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे.
पुराव्यासह इराणचे आव्हान
इराणची सरकारी वृत्तसंस्था 'IRNA'ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हे विमान पाडण्यापूर्वीचे आणि पाडल्यानंतरचे दृश्य दाखवण्यात आले आहे. एका फोटोत AWACS विमानाचा मागचा भाग पूर्णपणे तुटलेला दिसत आहे. इराणने या फोटोंद्वारे अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "अमेरिकन यंत्रणा त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या लष्करी संसाधनांचे संरक्षण करण्यासही सक्षम नाहीत, हे या फोटोंवरून स्पष्ट होते," असे इराणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
F-16 नंतर दुसरा मोठा दावा
विशेष म्हणजे, हा दावा करण्याच्या एक दिवस आधीच, म्हणजेच शनिवारी (२८ मार्च), इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेचे F-16 फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. एकापाठोपाठ एक दोन मोठी विमाने पाडल्याचे सांगून इराणने आपली लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अमेरिकेने दावे फेटाळले
दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "इराणची सेना खोटा प्रचार करत असून अमेरिकेचे कोणतेही विमान पाडण्यात आलेले नाही," असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. मात्र, इराणने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
Web Summary : Iran claims it downed a US AWACS plane at Saudi's Prince Sultan Air Base, presenting photos as proof. The US denies the claim, calling it propaganda, escalating tensions. This follows Iran's claim of shooting down an F-16.
Web Summary : ईरान ने सऊदी के प्रिंस सुल्तान एयर बेस पर अमेरिकी AWACS विमान को मार गिराने का दावा किया और तस्वीरें पेश कीं। अमेरिका ने इसे दुष्प्रचार बताते हुए खारिज किया, जिससे तनाव बढ़ गया। इससे पहले ईरान ने F-16 को गिराने का दावा किया था।