"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:28 IST2025-07-17T14:28:41+5:302025-07-17T14:28:58+5:30

Operation Sindoor : पाकिस्तानी नेत्यांनी अजब दावा करत म्हटले की, "आम्ही भारताचे १० ते २० लढाऊ विमाने पाडू शकलो असतो, पण..."

"We could have easily shot down 10-20 Indian jets, but..."; Bilawal Bhutto-Khwaja Asif's ridiculous claim! | "आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!

"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्याच पाठीवर थाप मारून, देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. पाकिस्तानचे नेते नेहमीच अतिशयोक्तीपूर्ण आणि काल्पनिक दावे करून स्वतःच आपल्या देशात आणि जगात हास्याचा विषय बनत आहेत. यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पुन्हा असाच एक हास्यास्पद दावा केला आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्याच देशात ट्रोल केले जात आहे.

या पाकिस्तानी नेत्यांनी एका अजब दाव्यात म्हटले आहे की, "आम्ही भारताचे १० ते २० लढाऊ विमाने पाडू शकलो असतो, पण आमच्यावर इतर देशांचा खूप दबाव होता की आम्ही त्यांची विमाने पाडू नयेत."

'टार्गेट लॉक झाले होते, पण...': ख्वाजा आसिफ यांचा अजब युक्तिवाद

स्वतःची पाठ थोपटून घेताना ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारताची १० फायटर जेट्स पाडण्यासाठी त्यांचे टार्गेट पूर्णपणे लॉक झाले होते. "आमचे सैनिक अशा स्थितीत होते की, ते भारताची १० विमाने पाडण्यासाठी पूर्णपणे तयार होऊन बसले होते," असे आसिफ म्हणाले.

जेव्हा पत्रकार हामिद मीर यांनी त्यांना विचारले, "जर पाडू शकला असता, तर मग का पाडले नाही?" यावर ख्वाजा आसिफ यांनी अजब उत्तर दिले, "ही आमची अंतर्गत गोष्ट आहे... पण ती माहिती तुम्हालाही माहीत आहे."

ख्वाजा आसिफ यांच्या दाव्यानुसार, पाकिस्तान त्या रात्री भारताची १२ फायटर जेट्स पाडू शकला असता, पण त्यांच्यावर २-३ देशांचा दबाव होता की, ती पाडू नयेत. त्यामुळे त्यांनी ती विमाने सोडली. यानंतर भारतानेही पाकिस्तानचे जास्त नुकसान केले नाही.

बिलावल भुट्टो यांचाही '२० जेट'चा दावा

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही याच प्रकारचा दावा केला. ते म्हणाले की, "पाकिस्तानी फौजेने भारताच्या २० फायटर जेट्सचे टार्गेट लॉक केले होते, पण त्यांना पाडण्यात आले नाही. फक्त ६ विमाने पाडली." ते पुढे म्हणाले, "तुम्ही विचार करा, असे का झाले असेल? कारण इतर देशांचा दबाव होता."

या दाव्यांमुळे पाकिस्तानची जगभरात पुन्हा एकदा खिल्ली उडवली जात आहे. अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यांनी पाकिस्तानचे नेते स्वतःच आपल्या देशाची प्रतिमा मलिन करत आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Web Title: "We could have easily shot down 10-20 Indian jets, but..."; Bilawal Bhutto-Khwaja Asif's ridiculous claim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.