शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:57 IST

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एकीकडे युद्ध चर्चेच्या माध्यमाने संपवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे मात्र, इराण आणि इस्रायल एकमेकांवर जबरदस्त हल्ले करताना दिसत आहेत. इराणने रविवारी दक्षिण इस्रायलमधील एका केमिकल प्लांटवर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यामुळे प्लांटमध्ये मोठी आग लागली. यामुळे परिसरात विषारी वायू गळतीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याला प्रत्युत्तर देत इस्रायलनेही रविवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर जबरदस्त बॉम्बिंग केली.चिनी मालकीचा प्लांट -ज्या प्लांटवर हा हल्ला झाला, तो चिनी मालकीच्या 'सिनजेंटा ग्रुप'चा भाग असलेल्या 'एडीएएमए' (ADAMA) कंपनीचा आहे. कंपनीच्या 'मख्तेशिम प्लांट'चे नेमके किती नुकसान झाले, याचा तपास सध्या सुरू आहे. कृषी रसायने आणि पीक संरक्षण साहित्य बनवणाऱ्या या प्लांटवर, थेट क्षेपणास्त्र पडले की इंटरसेप्ट केलेल्या क्षेपणास्त्राचा ढिगारा पडला, यासंदर्भात अद्याप स्पष्टता झालेली नाही. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.संबंधित भागापासून दूर राहण्याचे नर्देश -इस्रायलच्या अग्निशमन आणि बचाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमधील 'नियोत होवाव' या औद्योगिक क्षेत्रात ही आग लागली आहे. या भागात अनेक रासायनिक प्रकल्प असल्याने प्रशासनाने तातडीने ३४ अग्निशमन पथके तैनात केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ८०० मीटर परिसराबाहेर सध्या कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना -घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील रहिवाशांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाने जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये आगीचे लोळ आणि काळा धूर स्पष्टपणे दिसत आहे. हा भाग  दक्षिण इस्रालमधील बीयर शेवा शहरापासून १३ किमी अंतरावर असून येथे अनेक लष्करी तळही आहेत. गेल्या आठवड्यातही इराणने अराद आणि डिमोना शहरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात डझनावर लोक जखमी झाले होते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील, इस्रायली भूमीवर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानले जात आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Attacks Israel Chemical Plant; Residents Ordered to Stay Home

Web Summary : Iran struck an Israeli chemical plant, sparking a fire and toxic gas fears. Israel retaliated with strikes on Tehran. Residents near the plant were ordered to stay indoors. The attacked plant belongs to a Chinese-owned company.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलWarयुद्ध