युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:57 IST2026-03-30T08:57:04+5:302026-03-30T08:57:40+5:30

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

War takes a toxic turn Iran launches deadly missile attack on Israel Chemical plant catches fire, fears of toxic gas leak; Citizens ordered to stay indoors | युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

एकीकडे युद्ध चर्चेच्या माध्यमाने संपवण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे मात्र, इराण आणि इस्रायल एकमेकांवर जबरदस्त हल्ले करताना दिसत आहेत. इराणने रविवारी दक्षिण इस्रायलमधील एका केमिकल प्लांटवर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यामुळे प्लांटमध्ये मोठी आग लागली. यामुळे परिसरात विषारी वायू गळतीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याला प्रत्युत्तर देत इस्रायलनेही रविवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर जबरदस्त बॉम्बिंग केली.

चिनी मालकीचा प्लांट -
ज्या प्लांटवर हा हल्ला झाला, तो चिनी मालकीच्या 'सिनजेंटा ग्रुप'चा भाग असलेल्या 'एडीएएमए' (ADAMA) कंपनीचा आहे. कंपनीच्या 'मख्तेशिम प्लांट'चे नेमके किती नुकसान झाले, याचा तपास सध्या सुरू आहे. कृषी रसायने आणि पीक संरक्षण साहित्य बनवणाऱ्या या प्लांटवर, थेट क्षेपणास्त्र पडले की इंटरसेप्ट केलेल्या क्षेपणास्त्राचा ढिगारा पडला, यासंदर्भात अद्याप स्पष्टता झालेली नाही. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

संबंधित भागापासून दूर राहण्याचे नर्देश -
इस्रायलच्या अग्निशमन आणि बचाव विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इस्रायलमधील 'नियोत होवाव' या औद्योगिक क्षेत्रात ही आग लागली आहे. या भागात अनेक रासायनिक प्रकल्प असल्याने प्रशासनाने तातडीने ३४ अग्निशमन पथके तैनात केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  ८०० मीटर परिसराबाहेर सध्या कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

रहिवाशांना घरातच राहण्याच्या सूचना -
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील रहिवाशांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाने जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये आगीचे लोळ आणि काळा धूर स्पष्टपणे दिसत आहे. हा भाग  दक्षिण इस्रालमधील बीयर शेवा शहरापासून १३ किमी अंतरावर असून येथे अनेक लष्करी तळही आहेत. गेल्या आठवड्यातही इराणने अराद आणि डिमोना शहरांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात डझनावर लोक जखमी झाले होते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धातील, इस्रायली भूमीवर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानले जात आहेत.
 

Web Title : ईरान का इस्राइल पर भीषण हमला; निवासियों को घर में रहने का आदेश

Web Summary : ईरान ने इस्राइल के एक रासायनिक संयंत्र पर हमला किया, जिससे आग लग गई और जहरीली गैस का खतरा पैदा हो गया। इस्राइल ने तेहरान पर जवाबी हमला किया। संयंत्र के पास के निवासियों को घर के अंदर रहने का आदेश दिया गया। हमला किया गया संयंत्र एक चीनी स्वामित्व वाली कंपनी का है।

Web Title : Iran Attacks Israel Chemical Plant; Residents Ordered to Stay Home

Web Summary : Iran struck an Israeli chemical plant, sparking a fire and toxic gas fears. Israel retaliated with strikes on Tehran. Residents near the plant were ordered to stay indoors. The attacked plant belongs to a Chinese-owned company.