शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई रशियात? पुतिन यांनी विशेष विमान पाठवल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:26 IST

Mojtaba Khamenei Health Update: अमेरिकन हल्ल्यात इराणचे नवे नेते मोजतबा खामेनेई यांनी एक पाय गमावल्याचे वृत्त आहे. रशियामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून इराणने ही माहिती दडवली आहे.

मध्य आशियातील युद्धाने आता मुत्सद्दी आणि लष्करी स्तरावर एक नवे वळण घेतले आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांना गुप्तपणे उपचारासाठी रशियाची राजधानी मॉस्को येथे नेण्यात आल्याचा दावा कुवैती वृत्तपत्र 'अल-जरीदा'ने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः विशेष विमान पाठवून खामेनेई यांना मदतीचा हात दिला असल्याचे समजते.

वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने केलेल्या ज्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायावर आणि कंबरेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज होती. अशा परिस्थितीत पुतिन यांनी मोजतबा यांना मॉस्कोमध्ये उपचाराचा प्रस्ताव दिला.

कडक सुरक्षा आणि गुप्ततामोजतबा खामेनेई यांना एका रशियन लष्करी विमानातून अत्यंत गुप्तपणे मॉस्कोला नेण्यात आले. सध्या ते पुतिन यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका खाजगी रुग्णालयात कडक सुरक्षेत असून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, त्यांचा पाय कापण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने आपला पाय गमावल्याची बातमी जर जनतेपर्यंत पोहोचली, तर लष्कराचे मनोबल खचू शकते, या भीतीपोटी इराण सरकारने ही माहिती पूर्णपणे दडवून ठेवली आहे.

इराणचा नकारदुसरीकडे, इराण सरकारने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "सर्वोच्च नेते पूर्णपणे निरोगी असून ते इराणमध्येच आहेत," असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

रशिया-इराण मैत्री अधिक गडदपुतिन यांनी मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीनंतर त्यांना 'अटळ पाठिंबा' जाहीर केला होता. आता थेट वैद्यकीय मदत देऊन रशियाने या युद्धात इराणच्या बाजूने आपण खंबीरपणे उभे असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. इराणचे सर्वोच्च नेते अशा प्रकारे शारीरिकदृष्ट्या हतबल झाल्याने इराणच्या आगामी युद्धनीतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, रशियाने मोजतबा यांना दिलेला हा आश्रय आणि मदत अमेरिका व इस्रायलसाठी एक मोठे आव्हान मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's New Supreme Leader Khamenei in Russia? Putin Allegedly Sent Plane

Web Summary : Iran's new leader, Mojtaba Khamenei, was reportedly secretly flown to Moscow for treatment after being injured in an American airstrike. Putin allegedly sent a special plane. Iran denies this, claiming Khamenei is healthy and in Iran, despite reports of a leg amputation and Russian support.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन