युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 07:57 IST2026-03-26T07:56:32+5:302026-03-26T07:57:44+5:30

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले असून इराणने अमेरिकेचे F-18 फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आहे.

War erupts! Iran hits back at America, claims to have shot down 'F-18' fighter jet; video released | युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी

युद्धाचा भडका! इराणचा अमेरिकेला मोठा दणका, 'एफ १८' फायटर जेट पाडल्याचा दावा; व्हिडिओ केला जारी

मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा आता अधिकच भडकताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने पायदळी तुडवल्यानंतर, दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या शेकडो तळांवर एकाच वेळी हल्ले चढवले असतानाच, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने अमेरिकेचे अत्यंत आधुनिक 'F-18' फायटर जेट पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यासोबतच इराणने एक व्हिडिओही प्रसिद्ध केला असून जगभरात खळबळ उडाली आहे.

चाबहारजवळ ‘त्या’ विमानाचा खात्मा!

इराणच्या वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, चाबहारच्या सागरी सीमेजवळ अमेरिकेचे हे लढाऊ विमान घिरट्या घालत होते. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे विमान टार्गेट केले आणि क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला. इराणने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आकाशात एका विमानाला मिसाइल धडकताना, आग लागताना आणि त्यानंतर ते विमान हिंद महासागरात कोसळताना दिसत आहे. इराणचा हा दावा खरा असल्यास अमेरिकेसाठी हा मोठा लष्करी धक्का मानला जात आहे.

विमानवाहू युद्धनौकेवरही हल्ला?

केवळ विमानच नाही, तर अमेरिकेची महाकाय युद्धनौका 'यूएसएस अब्राहम लिंकन'वरही क्रूझ मिसाइलने हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. "जर ही युद्धनौका पुन्हा इराणच्या सागरी क्षेत्रात दिसली, तर तिचे अस्तित्व मिटवून टाकू," अशी उघड धमकीच इराणने दिली आहे. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हे सर्व दावे खोटे आणि चुकीची माहिती असल्याचं म्हणत फेटाळून लावले आहेत. "आमचे कोणतेही विमान किंवा जहाज नष्ट झालेले नाही," असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळला, आता आरपारची लढाई

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबादमार्फत इराणला एक शांतता प्रस्ताव पाठवला होता. मात्र, इराणने आपल्या अटी मान्य झाल्याशिवाय युद्ध थांबवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे नेते एम.बी. गालिबफ यांनी इशारा दिला आहे की, "जर शत्रूने आमच्या बेटांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना साथ देणाऱ्या प्रादेशिक देशांचे सर्व पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील."

Web Title : ईरान का अमेरिकी जेट गिराने का दावा, अमेरिका ने किया खंडन; तनाव बढ़ा

Web Summary : ईरान ने चाबहार के पास एक अमेरिकी एफ-18 लड़ाकू विमान को मार गिराने और एक युद्धपोत पर हमला करने का दावा किया, जिससे मध्य पूर्व में तनाव बढ़ गया। अमेरिका ने इन दावों का खंडन करते हुए इन्हें झूठी सूचना बताया है। ईरान ने ट्रम्प के शांति प्रस्ताव को खारिज कर दिया और अपनी धरती को खतरा होने पर जवाबी कार्रवाई की कसम खाई।

Web Title : Iran Claims Downing US Jet, US Denies; Tensions Soar

Web Summary : Iran claims it shot down a US F-18 fighter jet near Chabahar and struck a US warship, escalating Middle East tensions. The US denies these claims, dismissing them as false information. Iran rejected Trump's peace proposal, vowing retaliation if its territory is threatened.