युद्ध पेटले, आखातात तेल, गॅस खाणी संकटात! इराणचा कतारनंतर कुवैतच्या तेल रिफायनरीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:52 IST2026-03-19T13:51:12+5:302026-03-19T13:52:31+5:30

Iran Attacks on qatar, Kuwait: इस्रायलने जगातील सर्वात मोठ्या गॅस असलेल्या खाणीवरच हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणने कतार आणि कुवैतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांनाच लक्ष्य केले आहे. 

War breaks out, oil and gas fields in the Gulf are in danger! After Qatar, Iran attacks Kuwait's oil refinery | युद्ध पेटले, आखातात तेल, गॅस खाणी संकटात! इराणचा कतारनंतर कुवैतच्या तेल रिफायनरीवर हल्ला

युद्ध पेटले, आखातात तेल, गॅस खाणी संकटात! इराणचा कतारनंतर कुवैतच्या तेल रिफायनरीवर हल्ला

सर्वोच्च नेत्यासह महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींनाच इस्रायलने हल्ले करून मारल्यामुळे इराण खवळला आहे. जगातील सर्वात मोठा भूगर्भातील गॅसचा साठा असलेल्या साउथ पार्सवर इस्रायलने हवाई हल्ले केल्यानंतर इराणने कतार, कुवैतमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावरच मिसाईल्स डागल्या आहेत. त्यामुळे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाच्या रडावर तेल आणि गॅस साठे येऊ लागले आहेत. 

इस्रायलच्या साउथ पार्स गॅस फिल्डवरील हल्ल्यानंतर इराणने सर्वात आधी कतारच्या ऊर्जा केंद्रावर हल्ला क्षेपणास्त्रे डागली. कतारच्या सरकारी ऊर्जा कंपनीनेही याला दुजोरा दिला. गुरुवारी (१९ मार्च) पहाटे रास लाफानमधील मुख्य केंद्रावर असलेल्या गॅस फील्डवर रॉकेट डागण्यात आले. त्यामुळे आग लागील आणि प्रचंड नुकसान झाले आहे, असे कतारच्या ऊर्जा कपंनीने म्हटले आहे. 

इराणने यापूर्वीही रास लाफान औद्योगिक क्षेत्रात हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळेही बरंच नुकसान झाले होते. 

कुवैतच्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ले

इराणने कतारपाठोपाठ कुवैतलाही लक्ष्य केले. कुवैतकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यामुळे तेल रिफायनरीमध्ये आग लागली.

मीना अल अहमदी या रिफायनरीमध्ये आग लागली होती. पण, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मध्य पूर्वेतील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी ही एक आहे. या रिफायनरीची पेट्रोलियम शुद्धीकरण क्षमता दररोज ७,३०,००० बॅरल इतकी आहे. 

कुवैत लष्कराच्या प्रमुखांनी सांगितले की, जर स्फोटाचे आवाज येत असतील, तर नागरिकांनी घाबरू नये. अशा आवाजाचा अर्थ कुवैतच्या एअर डिफेन्स सिस्टिमने होणारे हल्ले हाणून पाडले जात आहेत. 

Web Title : युद्ध भड़का: खाड़ी में तेल, गैस क्षेत्र खतरे में; ईरान ने रिफाइनरियों पर हमला किया

Web Summary : इजरायली हमलों के बाद, ईरान ने कतर और कुवैत में तेल रिफाइनरियों को मिसाइलों और ड्रोन से निशाना बनाया। हमलों से आग और क्षति हुई, जिससे क्षेत्रीय तेल और गैस आपूर्ति को लेकर चिंताएं बढ़ गईं और ईरान-इजरायल तनाव बढ़ गया।

Web Title : War Ignites: Gulf Oil, Gas Fields Threatened; Iran Attacks Refineries

Web Summary : Following Israeli strikes, Iran retaliated, targeting oil refineries in Qatar and Kuwait with missiles and drones. Attacks caused fires and damage, raising concerns about regional oil and gas supplies and escalating Iran-Israel tensions.