विजय मल्याला झटका; दीर्घ लढाईनंतर भारतीय बँकांचा विजय, ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 21:26 IST2025-04-09T21:25:37+5:302025-04-09T21:26:39+5:30

फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली विजय मल्ल्याला भारतात फरार घोषित करण्यात आले आहे.

Vijay Mallya suffers setback; Indian banks win after long battle, assets in UK to be seized | विजय मल्याला झटका; दीर्घ लढाईनंतर भारतीय बँकांचा विजय, ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार

विजय मल्याला झटका; दीर्घ लढाईनंतर भारतीय बँकांचा विजय, ब्रिटनमधील मालमत्ता जप्त होणार

फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला मोठा धक्का बसला आहे. एसबीआयच्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांच्या एका संघाने मल्ल्याविरुद्ध यूकेमध्ये दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी न्यायालयीन खटला जिंकला. अशाप्रकारे, भारतीय बँकांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळाला आहे. किंगफिशर एअरलाइन्सवरील थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी भारतीय बँका करत आहेत.

भारतीय बँकांनी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती जेणेकरून ते त्याच्या ब्रिटनमधील मालमत्तेवरून कर्ज वसूल करू शकतील. आता ब्रिटिश न्यायालयाने भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला आहे. लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अँथनी मान यांनी भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला. तर विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या अपीलची परवानगी मागणारे दोन अर्ज फेटाळण्यात आले. 

बँकांसाठी महत्त्वाचा निर्णय
भारतीय बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदा फर्म टीएलटी एलएलपीने म्हटले की, या निकालामुळे बँकांना मल्ल्याच्या मालमत्तेवर कोणतेही संरक्षण नसल्याचे आणि दिवाळखोरीची याचिका वैध असल्याचे पुष्टी मिळाली आहे. टीएलटी एलएलपीचे कायदेशीर संचालक निक कर्लिंग म्हणाले, बँकांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. मल्ल्याविरुद्ध मिळालेल्या 1.12 अब्ज पौंडाच्या डीआरटी (कर्ज वसुली न्यायाधिकरण) निकालासंदर्भात 2017 पासून बँकांसाठी काम करत असल्याने टीएलटीला हा निकाल मिळाल्याबद्दल आनंद आहे.

Web Title: Vijay Mallya suffers setback; Indian banks win after long battle, assets in UK to be seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.