Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:21 IST2025-07-04T11:19:20+5:302025-07-04T11:21:21+5:30

Vijay Mallya-Lalit Modi: ललित मोदी आणि विजय माल्याच्या लंडनमधील पार्टीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Vijay Mallya Lalit Modi grand party in London; Many including Chris Gayle attended | Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित

Vijay Mallya-Lalit Modi: सुमारे नऊ वर्षांपूर्वी भारतातून पळून गेलेला फरार विजय मल्ल्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलाय. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक पॉडकास्ट समोर आला होता, ज्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्या पॉडकास्टची खूप चर्चा झाली. आता परत एकदा मल्ल्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, त्याने लंडनमध्ये आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदीसोबत केलेली ग्रँड पार्टी. 

हजारो कोटी रुपये घेऊन भारतातून पळून गेलेले हे लोक परदेशात कसे विलासी जीवन जगतात, हे यातून दिसून येते. ललित मोदी आणि विजय मल्ल्याच्या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पार्टी लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यात जगभरातून फक्त निवडक लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी खेळाडू ख्रिस गेल देखील या पार्टीत सामील होता.


जगभरातून 310 निवडक पाहुणे पार्टीला उपस्थित 
ललित मोदी यानेचा पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ललित मोदी आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या 'आय डिड इट माय वे' गाणे गाताना दिसतात. या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहितो, '310 मित्र आणि कुटुंबासह एक उत्तम रात्र...हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालणार, वादग्रस्तही ठरणार, परंतु मी हेच सर्वोत्तम करतो.'

ख्रिस गेलने पार्टीचा फोटो शेअर केला 
आरसीबीचा माजी स्टार ख्रिस गेलनेही विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेलने मल्ल्या आणि ललित मोदींसोबतचा फोटो पोस्ट करताना लिहिले की, "आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. एका अद्भुत संध्याकाळसाठी धन्यवाद."

विजय मल्ल्याला फरार घोषित 
विजय मल्ल्या 2016 मध्ये यूकेला पळून गेला होता, तेव्हापासून तो तिथेच राहत आहे. भारत सरकारने मल्ल्याला 2019 मध्ये फरार घोषित केले होते. त्याच्यावर 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने अलीकडेच पॉडकास्टमध्ये या आरोपांवर पहिल्यांदाच आपले मौन सोडले. त्याने म्हटले होते की, बँकांनी त्याच्याकडून सुमारे 14 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. 

ललित मोदीवर काय आरोप ?
ललित मोदींवर शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. हे प्रकरण 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलशी संबंधित आहे. त्या काळात ईडीने ललित मोदीवर आयपीएल स्थलांतरित करण्यासाठी पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. ज्यासाठी ईडीने ललितवर 10.65 कोटी रुपयांचा दंडur ठोठावला होता. यासोबतच, त्याच्यावर फेमाचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता.

पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

 

Web Title: Vijay Mallya Lalit Modi grand party in London; Many including Chris Gayle attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.