शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 5:20 PM

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्देमद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी लंडनमध्ये अटकअटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर करण्यात आलाविजय मल्ल्याला अटक करण्यात येण्याची ही दुसरी वेळ भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती

लंडन - बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याला जामीनदेखील मंजूर करण्यात आला. सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या विनंतीनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. विजय मल्ल्याला अटक करण्यात येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी 13 जून रोजी विजय मल्ल्याला अटक करण्यात आली होती. भारताने विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची विनंती केल्यानंतर ही अटकेची कारवाई झाली होती. मात्र त्यावेळीही अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला होता. न्यायालयाने 4 डिसेंबपर्यंत जामीन मंजूर केला होता. 6 जुलै 2018 रोजी पुढील सुनावणी होणार होती. 

मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.

ब्रिटनला पळून गेलेल्या कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याने किंगफिशर एअर लाइन्ससाठी घेतलेल्या ६,०२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा हिस्सा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (सेल कंपन्या) विविध सात देशांत पाठविला असल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे आता त्याला भारतात परत आणण्याची तयारी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चालविली आहे.

६१ वर्षीय मल्ल्याची मालकी असलेल्या किंगफिशर एअर लाइन्सकडे आयडीबीआय बँक आणि अन्य भारतीय बँकांचे ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज थकले आहे. त्यासाठी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तथापि, या कारवाईतून वाचण्यासाठी मल्ल्या ब्रिटनला पळून गेला आहे.

सूत्रांनी सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाकडून घेतलेल्या कर्जाचा पैसा मल्ल्याने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सात देशांत पाठविला आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बनावट कंपन्या आणि सात देशांतील बँक खात्यांचा संबंध आम्ही हुडकून काढण्यात यश मिळविले आहे. यासंबंधी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि आयर्लंड या देशांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्यातून तपास अधिका-यांना यासंबंधीचा आणखी तपशील मिळणार आहे. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याPoliceपोलिसLondonलंडनCrimeगुन्हा