Video: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा दणका! तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या युद्धनौका उडवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:10 IST2026-03-19T18:08:22+5:302026-03-19T18:10:02+5:30

होर्मुझ सामुद्रधुनीत इतर देशांच्या तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या इराणच्या युद्धनौकांवरच अमेरिकेने हल्ला केला. या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. 

Video: US hits Iran in the Strait of Hormuz! Warships attack oil tankers, shoot them down | Video: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा दणका! तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या युद्धनौका उडवल्या

Video: इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा दणका! तेल जहाजांवर हल्ला करणाऱ्या युद्धनौका उडवल्या

होर्मुझ सामुद्रधुनीत जगातील अनेक देशात कच्चे तेल आणि गॅसची वाहतूक होते. इस्रायल-अमेरिकेसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल-गॅस वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. मोजके देश वगळता इतर देशांच्या तेल, गॅस जहाजांवर इराणकडून हल्ले केले जात असतानाच अमेरिकेने इराणवर पलटवार केला. अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील युद्धनौकावर रॉकेट हल्ले केले. 

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. यात काही युद्धनौकांवर रॉकेट हल्ले केले केल्याचे दिसत आहेत. 

अमेरिकेचे इराणच्या यु्द्धनौकांवर हल्ले, व्हिडीओ बघा

   

इराणकडून कुवैत, कतारमधील तेल आणि गॅस प्रकल्पांना लक्ष्य केले गेले असतानाच अमेरिकेकडून इराणला उत्तर देण्यात आले आहे. 

होर्मुझ सामुद्रधुनीतून होणार कच्चे तेल आणि गॅसची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. भारताची २२ जहाजे पर्शियन गल्फमध्ये अडकून पडली आहेत. यातील काही जहाजांवर गॅस, तेल आणि पेट्रोलियम घटक भरले गेलेले आहेत. 

इराणकडून तेल, गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांवरही हल्ले केले गेले आहेत. यात अमेरिका, थायलंड आणि ग्रीकच्या जहाजाचाही समावेश आहे. इराणकडून हल्ले केले गेले, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, ब्रिटनसह काही देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. 

मात्र, यातील काही देशांनी नकार दिला. तर काही देशांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले होते. आम्हाला त्या देशांची गरज नाही. जे देश आम्हाला मदत करतील आणि जे करणार नाहीत, अशांनाही लक्षात ठेवू असे धमकीवजा विधान ट्रम्प यांनी केले होते. 

Web Title : होरमुज़ में ईरान पर अमेरिकी पलटवार, तेल जहाजों पर हमला करने वाले युद्धपोत नष्ट।

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, अमेरिका ने तेल टैंकरों पर हमलों के बाद होर्मुज़ जलडमरूमध्य में ईरानी युद्धपोतों पर हमला किया। जलडमरूमध्य का तेल और गैस परिवहन बाधित हो गया है, जिससे जहाज फंसे हुए हैं। ईरान द्वारा कुवैती और कतरी ऊर्जा परियोजनाओं को निशाना बनाने के बाद अमेरिका ने जवाब दिया।

Web Title : US retaliates against Iran in Hormuz, destroys oil tanker-attacking warships.

Web Summary : Amidst rising tensions, the US military struck Iranian warships in the Strait of Hormuz following attacks on oil tankers. The Strait's oil and gas transport is disrupted, leaving ships stranded. The US responded after Iran targeted Kuwaiti and Qatari energy projects.