मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 09:43 IST2025-10-12T09:40:51+5:302025-10-12T09:43:50+5:30
लॉस एंजेलिसमधील हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

फोटो - आजतक
लॉस एंजेलिसमधील हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे, ज्यात हेलिकॉप्टरमधील दोन जण आणि रस्त्यावर असलेले तीन जण आहेत. याचा एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पोलीस विभागाच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, हंटिंग्टन बीच पोलीस विभाग आणि हंटिंग्टन बीच अग्निशमन विभागाने शनिवारी पॅसिफिक कोस्ट हायवे आणि हंटिंग्टन स्ट्रीटवर झालेल्या दुर्घटनेबाबत सांगितलं. हेलिकॉप्टरमधून दोन जण बाहेर पडले आणि रस्त्यावर असलेले तीन जण जखमी झाले.
🇺🇲||Watch the moment a helicopter spins out of control mid-air and crashes at California\'s Huntington Beach. pic.twitter.com/3xMvNO1e33
\— Abhimanyu Manjhi (@AbhimanyuManjh5) October 12, 2025
शनिवारी दुपारी हंटिंग्टन बीचवर एक हेलिकॉप्टर कोसळलं. टेकऑफनंतर काही वेळातच हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर जाऊ लागलं, हवेत गोल गोल फिरलं, नंतर झाडवर आदळलं आणि पॅसिफिक कोस्ट हायवे (PCH) वर कोसळलं. या अपघातात किमान पाच जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एक जण थोडक्यात बचावला आहे.